esakal | तुमचे उत्पन्न एक लाखावर आहे ना, मग पांढरे रेशनकार्ड मस्ट! 
sakal

बोलून बातमी शोधा

Ration card

रिक्त इस्टकाच्या मर्यादेचा विचार करता अर्जांची छाननी व चौकशी करणे, यामुळे पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यास विलंब आणि अडसर निर्माण होत आहे. यासाठी आता एका लाखापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या नागरिकांना त्यांचे रेशनकार्ड शुभ्र करून घ्यावे लागणार आहे.

तुमचे उत्पन्न एक लाखावर आहे ना, मग पांढरे रेशनकार्ड मस्ट! 

sakal_logo
By
राजेश तंतरपाळे

अमरावती : कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त असलेल्या शिधापत्रिकाधारकांना त्यांच्या शिधापत्रिका आता शुभ्र (पांढरी) करून घ्याव्या लागणार आहेत. 

पीएमजीकेवाय आणि आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत प्रतिव्यक्ती पाच किलो तांदूळ मोफत दिला जात आहे. अशाच पद्धतीने केशरी कार्डवरसुद्धा प्रतिव्यक्ती पाच किलो धान्य दिले जात आहे. अनेक नागरिकांनी त्यांच्या शिधापत्रिका प्राधान्य गटात समाविष्ट करून अन्नसुरक्षा योजनेच्या लाभासाठी अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयाकडे अर्ज केलेले आहेत. त्यात सधन व्यापारी, शेतकरी, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी, शासकीय व निमशासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे अन्नधान्य वितरण अधिकारी नीता लबडे यांनी म्हटले आहे.

अवश्य वाचा- आजवर जिने बांधली राखी तीच उठली जीवावर, अन् घडले भयंकर....

रिक्त इस्टकाच्या मर्यादेचा विचार करता अर्जांची छाननी व चौकशी करणे, यामुळे पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यास विलंब आणि अडसर निर्माण होत आहे. यासाठी आता एका लाखापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या नागरिकांना त्यांचे रेशनकार्ड शुभ्र करून घ्यावे लागणार आहे. त्यामध्ये नागरिक सधन व्यापारी, शेतकरी, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी, शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचाही समावेश राहणार आहे. शासकीय व निमशासकीय कार्यालयाच्या प्रमुखांनी त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांची शिधापत्रिका शुभ्र आहे किंवा नाही याची खातरजमा करावी, अशा सूचना देण्यात आल्याचे अन्नधान्य वितरण अधिकारी नीता लबडे यांनी सांगितले. 

अवश्य वाचा- ती नऊ महिन्यांची होती गर्भवती अन् प्रसूती वेदना झाल्या असह्य, होणाऱ्या बाळासाठी....

सद्यस्थितीत जिल्ह्यात शुभ्र रेशनकार्डधारकांची संख्या 12 हजार, केसरी रेशनकार्ड धारकांची संख्या 30 हजार असून त्याद्वारे एक लाख पाच हजार दोनशे व्यक्तींना अन्नधान्य दिले जाते. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय प्राधान्य गट आणि शेतकऱ्यांचे एकूण 65 हजार रेशनकार्ड आहेत. त्यामध्ये अंत्योदय आणि प्राधान्य गटात दोन लाख 88 हजार 626 आणि शेतकरी 20,302 अशा एकूण 3 लाख 8 हजार 986 व्यक्तींना अन्नधान्य दिले जात आहे.  

संपादन - राजेंद्र मारोटकर

loading image
go to top