खाजगी दवाखाने व औषध दुकानदारांना तुकाराम मुंढेंनी दिली हा इशारा...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 मार्च 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र संचारबंदी व साथरोग प्रतिबंधात्मक कायद्याची अंमलबजावणी केली जात आहे. मात्र नागरिकांना अत्यावश्‍यक सेवा मिळवून देण्यासाठीही महापालिका प्रशासन धडपड करीत आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना घरपोच किराणा, भाजी, दूधजन्य फळे, औषधी मिळावी, यासाठी पुढाकार घेतला. या संचारबंदीच्या काळात काही खाजगी डॉक्‍टरांनी त्यांची दवाखाने, रुग्णालयेही बंद केली.

नागपूर : रुग्णालये, दवाखाने, औषधी दुकाने अत्यावश्‍यक सेवेत असून ती बंद करून रुग्णांना सेवा देणे टाळणाऱ्या डॉक्‍टरांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज दिला. रुग्णालये, दवाखाने, औषधी दुकाने, पॅथॉलॉजी लॅब सुरू ठेवावे, असे आदेश काढले. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र संचारबंदी व साथरोग प्रतिबंधात्मक कायद्याची अंमलबजावणी केली जात आहे. मात्र नागरिकांना अत्यावश्‍यक सेवा मिळवून देण्यासाठीही महापालिका प्रशासन धडपड करीत आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना घरपोच किराणा, भाजी, दूधजन्य फळे, औषधी मिळावी, यासाठी पुढाकार घेतला. या संचारबंदीच्या काळात काही खाजगी डॉक्‍टरांनी त्यांची दवाखाने, रुग्णालयेही बंद केली. त्यामुळे कोरोनाशिवाय इतर कुठल्याही आजाराने ग्रस्त रुग्णांना सेवा मिळत नसल्याची बाब आयुक्तांच्या निदर्शनास आली. एवढेच नव्हे तर काही नागरिकांनीही महापालिकेने सुरू केलेल्या कोरोनासंदर्भातील नियंत्रण कक्षात याबाबत तक्रार केल्या आहेत.

डॉक्‍टरांवर होणार कारवाई 
या तक्रारींची दखल घेत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज खाजगी रुग्णालये, दवाखाने, औषधी दुकानांबाबत आदेश काढले. शहरात साथरोग प्रतिबंधात्मक कायद्याची अंमलबजावणी सुरू आहे. वैद्यकीय सेवा ही अत्यावश्‍यक सेवा असून त्या सेवा देणे टाळणे साथरोग प्रतिबंधात्मक कायद्याचे उल्लंघन आहे. खाजगी डॉक्‍टरांनी दवाखाने, रुग्णालये तसेच औषध विक्रेत्यांनी औषधी दुकाने बंद ठेवल्यास साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्तांनी दिला. या आदेशाची प्रत आयुक्तांनी इंडियन मेडिकल असोसिएशन व केमिस्ट ऍन्ड ड्रगिस्ट असोसिएशनला पाठविले आहे. या आदेशाचे पालन व्हावे, याबाबत दक्षता घेण्याचे निर्देशही आयुक्तांनी या दोन्ही संघटनेला दिले आहे. 

तू मला आवडली, माझ्याशी शारीरिक संबंध ठेव म्हणत करायचा हा प्रकार...

पशुंची दवाखाने सुरू ठेवण्याचे आवाहन 
शहरात मोठ्या प्रमाणात वेटरनरी क्‍लिनिक, हॉस्पिटल्स आहेत. संचारबंदीच्या काळात पाळीव प्राण्यांनाही उपचाराची गरज लक्षात घेता महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी शहरातील पशु वैद्यकीय दवाखाने सुरू ठेवण्याचे आवाहन केले आहे. पशुवैद्यकीय दवाखाने सुरू ठेवताना कोरोना संदर्भात आवश्‍यक काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tukaram mundhe strict orders to private doctors