पदवीधर निवडणूक : पाच बाद झाल्यानंतर रिंगणात २६ उमेदवार; गाठीभेटी सुरू

नीलेश डोये
Saturday, 14 November 2020

आता २६ उमेदवारच रिंगणात राहिले आहेत. यातून आता कोण माघार घेतो यानंतर लढत निश्चित होणार आहे. १७ नोव्हेंबर हा माघारीसाठी शेवटचा दिवस आहे.

नागपूर : विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी दावेदारी दाखल करणाऱ्यांपैकी पाच उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. त्यामुळे आता २६ उमेदवारच रिंगणात राहिले आहेत. यातून आता कोण माघार घेतो यानंतर लढत निश्चित होणार आहे. १७ नोव्हेंबर हा माघारीसाठी शेवटचा दिवस आहे.

पाच नोव्हेंबरपासून निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. एक डिसेंबरला मतदान तर तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. अभिजित वंजारी (कॉंग्रेस), संदीप जोशी (भाजप), किशोर वरभे (लोकभारती), राजेंद्रकुमार चौधरी (रिपाइं), राहुल वानखडे (वंचित बहुजन आघाडी), सुनिता पाटील (इंडियन नॅशनल मानवाधिकार पार्टी), अजय तायवाडे, अतुलकुमार खोब्रागडे, अमित मेश्राम, गोकुलदास पांडे, धर्मेश फुसाटे, नितीन रोंघे,

अधिक माहितीसाठी - खासदार नवनीत राणा धडकणार मातोश्रीवर; मुख्यमंत्री पत्राला उत्तर देत नसल्याचा आरोप

नितेश कराळे, प्रकाश रामटेके, प्रशांत डेकाटे, ॲड. मोहमद शाकीर, रामराव चव्हाण, राजेंद्र भुतडा, विनोद राऊत, वीरेंद्र जयस्वाल, शरद जीवतोडे, शिवाजी सोनसरे, सच्चीदानंद फुलेकर, संगीता बढे, संजय नासरे, संदीप रमेश जोशी (सर्व अपक्ष) यांची दावेदारी सध्या कायम आहे. दरम्यान, संदीप जोशी आणि अभिजित वंजारी यांनी ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभाठी घेऊन प्रचाराला सुरुवात केली.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twentysix candidates are in the fray for the graduate election