भारतात दोन कोटी जोडपी संततीशिवाय

Two crore couples in India without offspring
Two crore couples in India without offspring

नागपूर : काळानुसार मानवी समाजाच्या कुटुंबव्यवस्थेत, जीवनशैलीत बदल झाला. आयुष्यात ताणतणाव आले. यातच देशाची लोकसंख्या 130 कोटींवर पोहोचली. 1975 ते 1980 या काळात प्रजननक्षमतेचा दर 4.97 टक्के होता. सध्या हा दर 2.3 टक्‍क्‍यांवर असून आगामी 2021 मध्ये प्रजननक्षमतेचा दर 1.9 टक्‍क्‍यांवर घसरणार आहे, अशी नोंद केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केली असून सध्या भारतात दोन कोटी निपुत्रिक जोडपी असल्याची माहिती स्त्रीरोग प्रसूतीतज्ज्ञ डॉ. लक्ष्मी श्रीखंडे यांनी दिली.

स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र तज्ज्ञांची संघटना आणि श्रीखंडे रुग्णालयाय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारपासून (11 व 12 जानेवारी) वंध्यत्वावर दोनदिवसीय "मास्टर क्‍लास' परिषदेचे आयोजन केले आहे. हे निमित्त साधून डॉ. श्रीखंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देशात सरासरी लोकसंख्येशी प्रजनन क्षमतेचा दर दोनपैकी एक महिला वंध्यत्वाच्या जोखमीवर उभी असल्याची चिंता स्त्रीरोग प्रसूतीतज्ज्ञ डॉ. श्रीखंडे यांनी यावेळी व्यक्त केली. देशातील 58 टक्के जिल्हा रुग्णालये कृत्रिम गर्भधारणेचे तंत्र सामान्यांपर्यंत पोचविण्यात अयशस्वी आहेत. इतकेच नाही, तर सरकारी पातळीवरील जेमतेम 8 टक्के समूह रुग्णालयांत हे तंत्र अवगत असलेले तज्ज्ञ उपलब्ध आहेत.या मास्टर क्‍लासमध्ये वंध्यत्व हा विषय शास्त्रीय अंगाने चर्चीला जाईल. पत्रकार परिषदेत डॉ. अनिल श्रीखंडे उपस्थित होते.

जीवनशैलीमुळे झालेले बदल

  • -स्थूलपणा ही आजच्या पिढीची समस्या बनली आहे.
  • -वाढते वजन उच्च रक्तदाब आणि मधुमेहास ठरते कारणीभूत
  • -जीवनशैलीतून महिलांमध्ये गर्भाशयाचा कॅन्सर वाढतोय
  • -यातूनच वंध्यत्वाची जोखीमही वाढत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com