नागपूरकरांची दोन दिवस कसोटी; आज रात्रीपासून ‘जनता कर्फ्यू`; घरांमध्येच राहण्याचे महापौरांचे आवाहन

राजेश प्रायकर 
Friday, 18 September 2020

कोव्हिड संक्रमणाची जनतेच्या मनामध्ये भीती निर्माण झाली असून त्यासाठी शहरात दोन दिवस ‘जनता कर्फ्यू’ लागू करणे आवश्यक आहे, अशी भूमिका सर्वच जनप्रतिनिधींनी बुधवारी झालेल्या बैठकीत मांडली होती.

नागपूर : शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांची वाढ होत असताना नागरिक बिनधास्त बाहेर फिरत आहेत. त्यामुळे महापौर संदीप जोशी यांनी घोषित केलेल्या जनता कर्फ्यूदरम्यान घरांमध्येच राहण्यासाठी नागपूरकरांचा कस लागणार आहे. उद्या शनिवार तसेच रविवार दोन दिवस जनता कर्फ्यू असला तरी याबाबत महापालिकेने कुठलेही आदेश काढले नाही. त्यामुळे नागपूरकरांच्या इच्छेवर जनता कर्फ्यूचे यश अवलंबून राहणार आहे.

हेही वाचा - चक्‍क देवीसमोर गुडघे टेकले होते कट्टर इस्लाम मानणारा बादशहा औरंगजेबाने! वाचा कुठे आहे मंदिर

कोव्हिड संक्रमणाची जनतेच्या मनामध्ये भीती निर्माण झाली असून त्यासाठी शहरात दोन दिवस ‘जनता कर्फ्यू’ लागू करणे आवश्यक आहे, अशी भूमिका सर्वच जनप्रतिनिधींनी बुधवारी झालेल्या बैठकीत मांडली होती.

आमदार आणि इतर जनप्रतिनिधींच्या सूचनेवरून महापौर संदीप जोशी यांनी सप्टेंबरमधील शनिवार, रविवार जनता कर्फ्यूची घोषणा केली. त्यानुसार आज रात्री साडेनऊ वाजतापासून जनता कर्फ्यूला सुरुवात झाली. सोमवारी सकाळी साडेसात वाजेपर्यंत जनता कर्फ्यू राहणार आहे. 

मागील जुलै महिन्यातही जनता कर्फ्यूला नागपूरकरांनी संमिश्र प्रतिसाद दिला होता. उद्या शनिवारपासून सुरू होणाऱ्या जनता कर्फ्यूला नागपूरकरांनी घरात राहून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांंनी केले आहे. 

एकदा वाचाच - ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये तब्बल ५ कोटी जिंकलो आणि आयुष्य झाले खडतर" स्वतःच सांगतोय करोडपती सुशील कुमार..वाचा सविस्तर

जनता कर्फ्यूबाबत महापालिका प्रशासनाचे कुठलेही आदेश नाही. जनता कर्फ्यू ऐच्छिक असल्याने बिनधास्त फिरणाऱ्यांपुढे स्वतःवर लगाम लावण्याचे आव्हान राहणार आहे. मनावर ताबा ठेऊन नागपूरकर जनता कर्फ्यूला किती प्रतिसाद देतात? याबाबत पदाधिकारी, प्रशासनातही उत्सुकता आहे.

‘जनता कर्फ्यू’च्या काळात औषधी दुकाने व्यतिरिक्त कोणतीही दुकाने, आस्थापने सुरू ठेवू नये, नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये. शहरातील व्यापारी वर्गानेसुध्दा स्वयंस्फुर्तीने त्यांची दुकाने व आस्थापना दोन दिवस बंद ठेऊन या मोहिमेस सहकार्य करावे.
- संदीप जोशी,
महापौर. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two days Janata curfew in nagpur