मौजमस्ती भोवली... मकरधोकडा जलाशयात बुडून दोन मित्रांचा करुण अंत

Two friends drown in reservoir in Nagpur
Two friends drown in reservoir in Nagpur

नागपूर : लॉकडाउनमुळे बाहेर फिरायला जाण्यावर बंदी आली आहे. कोरोनाच्या भीतीपोटी नागरिकच घराबाहेर निघणे टाळत आहे. परंतु, इतके दिवस घरी राहल्यानंतर आता बाहेर निघण्यास तरुण घाई करीत आहे. चोरट्यामार्गाने पोलिसांपासून वाचत ते बाहेर फिरायला जात आहे. इतके दिवस घरी बंदीस्त राहल्यानंतर आता तरी मजा करावी असा विचार करीत ते बाहेर जाण्यासाठी धडपडत आहेत. मात्र, मौजमस्ती करण्यासाठी गेलेल्या काही तरुणांसोबत पुढील प्रकार घडला... 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपुरातील रोहित गोंडाणे (19), कौशिक लारोकर (17), मिहीर चावला (18), अतुल धार्मिक (26), राजेश रहाटे (18), आर्यन सहारे (16, सर्व रा. शांतीनगर) या सहा मित्रांनी लॉकडाउननंतर मौजमस्ती व पार्टी करण्याचे ठरवले. पार्टी करण्यासाठी उमरेडजवळील मकरधोकडा येथील जलाशयावर जाण्याचा बेत आखला. येथे सहाही युवकांनी पार्टी केली.

काही वेळांनी त्यांना पाण्यात उतरण्याचा मोह आवरता आला नाही. यामुळे सर्वजण जलाशयात पोहण्यासाठी उतरले. पोहत असताना रोहित गोंडाणे व कौशिक लारोकर पंपहाउसकडील डोहाकडे गेले. यानंतर ते गटांगळ्या खाऊ लागले. इतरांनी त्यांना वाचविण्याचे बरेच प्रयत्न केले. परंतु, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. धोका ओळखून अन्य चारही जण जलाशयाबाहेर निघाले. रोहित व कौशिक यांना पोहता येत नसल्याने त्यांना जलाशयात बुडून मृत्यू झाला. 

घटनेची माहिती मिळताच उमरेडचे पोलिस निरीक्षक विलास काळे यांनी गुलाब धुर्वे, ईश्वर जोधे, रूपेश महादुले, ज्ञानी गुरपुडे, सुहास बावनकर, पांडुरंग मुंडे, बालू वाटे या पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. रोशन नान्हे, विलास दूधपचारे, गुलाब कामठे, रवी नागपुरे या स्थानिक तरुणांच्या मदतीने रोहित व कौशिक यांना शोधण्याचे कार्य सुरू करण्यात आले. अथक प्रयत्नाअंती रोहित व कौशिकचे मृतदेहच हाती लागले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी उमरेड ग्रामीण रुग्णालयाकडे रवाना केले. उमरेड पोलिसांनी घटनेची नोंद करीत पुढील तपास सुरू केला आहे.

दोघांना पोहता येत नव्हते!

लॉकडाउननंतर काही तरुणांनी मौजमस्ती करण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखता. उमरेडजवळील मकरधोकडा येथील जलाशयावर सहा मित्र गेले. यानंतर त्यांनी जलाशयात उतरण्याचे ठरवले. पोहत असताना रोहित व कौशिक डोहाकडे गेले आणि पाण्यात बुडू लागले. अन्य मित्रांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, काहीही उपयोग झाला नाही. पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. 

म्हणून वाचले चौघांच प्राण

रोहित व कौशिक पाण्यात बुडत असल्याचे पाहून अन्य चार मित्रांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही परिस्थितीत त्यांचा जीव वाचविण्यासाठी ते धडपडत होते. परंतु, त्यांच्या प्रयत्नांना यश काही येत नव्हते. रोहित व कौशिक होहातील पाण्यात बुडत होते. संभाव्य धोका ओळखून अन्य चार मित्रांना पाण्यातून बाहेर येण्याचे ठरवले. वेळीच ते बाहेर आले नसते तर त्यांनाही जीव गमवावा लागला असता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com