नागपुरात वेगवेगळ्या अपघातात दोघे ठार, एक जखमी

टीम ई सकाळ
Friday, 25 September 2020

नागपुरातील अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिक अप व्हॅनने पादचाऱ्यांना धडक दिली. यामध्ये एक ठार झाला, तर दुसरा गंभीर जखमी आहे. तसेच दुसऱ्या अपघातामध्ये एक दुचाकीस्वार ठार झाला आहे.

नागपूर : अनियंत्रित झालेल्या भरधाव बोलेरो पिकअप व्हॅनने पादचाऱ्यांना घडक दिली. यामध्ये एक जण ठार, तर दुसरा गंभार जखमी झाला. गुरुवारी रात्री ११ च्या सुमारास अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमरावती मार्गावर न्यू फुटाळा वस्तीत ही घटना घडली. 

जीवन लक्ष्मण कनोजिया(४५ ,असे मृताचे, तर संजय हारोडे(३८), असे जखमीचे नाव आहे. दोघेही न्यू फुटाळा वस्तीतील रहिवासी असून रात्री जेवणानंतर घराजवळच फिरत होते. त्याचवेळी बोलेरो पिकअप व्हॅन वाडीकडून रविनगरच्या दिशेने भरधाव जात होती. वाहन भरधाव असल्याने उतारावरून वेग अधिकच वाढून चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. या वाहनाने रस्त्यावरून फिरणारे कनोजिया आणि होरोडे यांना जोरदार घडक दिली. दोघेही गंभीर जखमी झाले, तर अन्य फिरणारे नागरिक सुदैवाने बचावले.

 दोन्ही मुलींना होती बाबांची प्रतीक्षा, पण घडले...

घटनेनंतर बोलेरोचालक पळून गेला. नागरिकांनी धावपळ करीत कनोजिया यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, तर हारोडे यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान कनोजिया यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

शहिद नरेश बडोले अनंतात विलीन, शहिद बडोले यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार -
भरधाव दहा चाकी कंटेनरच्या धडकेत दुचाकीचालक ठार झाल्याची घटना गुरुवारी दुपारी पारडी नाका परिसरात घडली. अनील वालकर (४४), असे मृताचे नाव असून तो  मौदा येथील वाकेश्वरचा रहिवासी होता. ते काही कामानिमित्त नागपुरात आले होते. काम आटोपून आपल्या दुचाकीने गावी परतत असताना नाका परितरात भरधाव कंटेनरने त्यांच्या वाहनाला मागून धडक दिली. यात त्यांचा घटनास्थाळीच मृत्यू झाला. याप्रकरणी पारडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two killed and other injured in two different accident in nagpur