"पैसे मागू नकोस अन्यथा ठार मारू"; दोघांनी दिली डॉक्टरला धमकी

अनिल कांबळे  
Saturday, 31 October 2020

डॉ. श्रीतीज युवराज लानगे (वय ३९ रा. शेषनगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. जितेंद्र व विनोद प्रॉपर्टी डिलिंगचे काम करतात.

नागपूर ः भूखंड विक्रीचा करारनामा करून डॉक्टरची तब्बल ५८ लाखांनी फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. विनोद अनंतराम लांजेवार (वय २५) व जितेंद्र अनंतराम लांजेवार (वय ३०) दोन्ही रा. महाभगवतीनगर,चिखली रोड, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

डॉ. श्रीतीज युवराज लानगे (वय ३९ रा. शेषनगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. जितेंद्र व विनोद प्रॉपर्टी डिलिंगचे काम करतात.

अधिक वाचा - ...अन् शोकाकुळ नातेवाईक मृतदेह विसाव्यावर सोडून सैरावैरा पळू लागले

२०१६ मध्ये श्रीतीज यांनी मौजा काल डोंगरी येथे हॉस्पिटल बांधण्यासाठी भूखंड खरेदी केला. मात्र त्यांना येथे हॉस्पिटल बांधण्याची परवानगी मिळाली नाही. याबाबत विनोद व जितेंद्र याला कळले. दोघांनी डॉक्टरशी संपर्क साधला. भूखंडावर प्लॉट पाडून ते विकल्यास दुप्पट पैसे मिळतील. नफा प्रत्येकी ३३ टक्के असा वाटून घेऊ, असे दोघांनी डॉक्टरला सांगितले. 

डॉक्टर त्यांच्या आमिषाला बळी पडले. लांजेवार बंधूने डॉक्टरशी करार करून लवकुशनगर येथे साई कृपा लॅण्ड डेव्हलपर ॲण्ड बिल्डर्स नावाने कार्यालय उघडले. साई कृपा बिल्डर्स नावाने आयसीआयसीआय बँकेत खाते उघडले. 

क्लिक करा - जीवलग मित्राने दिला दगा; गर्भवती झाल्यानंतर उचलले टोकाचे पाऊल

प्लॉट ग्राहकांना विकले. ग्राहकांकडून घेतलेली ५८ लाख ५६ हजारांची रोख स्वत:च्या खात्यात जमा करून डॉक्टरची फसवणूक केली. डॉक्टरने दोघांना पैशाची मागणी केली. दोघांनी व्हॉट्सॲपवर मॅसेज पाठवून डॉक्टरला ठार मारण्याची धमकी दिली. डॉक्टर लागने यांनी हुडकेश्वर पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two men did fraud with a doctor in nagpur