उल्लेखनीय सेवेबद्‌दल गौरव, नागपूरच्या या दोन पोलिसांना राष्ट्रपती पदक जाहीर

police award
police award

नागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपाधीक्षक मिलिंद तोतरे आणि गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार बट्‌टूलाल पांडे यांना उल्लेखनीय सेवेबद्‌दल राष्ट्रपतींचे पोलिस पदक घोषित करण्यात आले आहे. दोन्ही पोलिस अधिकाऱ्यांवर शहर पोलिस दलातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

1989 मध्ये तोतरे हे पोलिस उपनिरीक्षक म्हणून पोलिस दलात दाखल झाले. सोनेगाव आणि प्रतापनगर पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असताना तोतरे यांनी गुंडांविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई केली. त्यानंतर ते केंद्रीय गुप्त वार्ता विभागात प्रतिनियुक्तीवर गेले. ब्युरो ऑफ इमिग्रेशनअंतर्गत अटारी येथील चेकपोस्टवरही तोतरे यांनी उल्लेखनीय कार्य केले. प्रतिनियुक्तीवरून परतल्यानंतर तोतरे यांनी आर्थिक गुन्हेशाखा येथे कर्तव्य बजावले. यादरम्यान त्यांनी महिला बॅंकेतील आर्थिक गैरव्यवहार, महापालिकेतील क्रीडा साहित्य घोटाळा, टॅंकर घोटाळा, पिंटू शिर्के हत्याकांड आदींसह अत्यंत संवेदनशील 20 पेक्षा अधिक प्रकरणांचा तपास यशस्वी तपास केला.

- कर्नाटकच्या चित्ररथाला विदर्भातील मूर्तिकारांचे हात

सध्या तोतरे सिंचन घोटाळ्याचा तपास करीत आहेत. त्यांना 200 पेक्षा अधीक बक्षीसे मिळाली आहेत. गेल्या काही वर्षांपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर येथे ते कार्यरत आहेत. त्यांना राष्ट्रपती पोलिस पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.

यासोबतच नागपूर शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलिस हवालदार बट्‌टूलाल पांडे यांनाही राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. पांडे हे 1988 ला शहर पोलिस दलात पोलिस शिपाई म्हणून भरती झाले होते. कर्तबगार पोलिस कर्मचारी म्हणून बट्‌टू यांची ओळख आहे. त्यांना आतापर्यंत 341 रिवॉर्डस मिळालेले आहेत. उल्लेखनीय कामगिरींमध्ये सक्‍करदऱ्यातील ट्रिपल मर्डर, कुश कटारिया, हेमंत दियेवार हत्याकांड, विजू मोहोड हत्याकांड, न्यायमंदिरातील चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात बट्‌टू यांची भूमिका महत्त्वाची आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com