हे आणखी काय ! मोबाईलच्या दुकानातून थेट घरपोच कोरोना, चौदा मैल येथे दोन "पॉजिटिव्ह'...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 जून 2020

शनिवारी 54 वर्षीय महिलेचा मुलगा (वय 40) आणि सून (वय 38) या दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. 54 वर्षीय महिला नागपूर येथील सतरंजीपुरा येथे अंत्यसंस्काराला गेली होती. एक-दोन दिवस राहून स्वतःच्या गावी चौदामैल येथे परत आली. राष्ट्रीय महामार्गावर तिच्या मुलाचे मोबाईल शॉप आहे.

बाजारगाव(जि.नागपूर) : येथून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 वरील कळमेश्वर तालुक्‍यातील चौदामैल येथे शुक्रवारी एक 54 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. या दुकानाची मालकी महिलेकडे असल्यामुळे परिसरात कोरोना पसरल्याची चर्चा आहे.
हेही वाचा : भयंकर ! पब्जीचा स्कोअर न झाल्याने नागपुरातील युवकाने घेतला गळफास

महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह
शनिवारी 54 वर्षीय महिलेचा मुलगा (वय 40) आणि सून (वय 38) या दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. 54 वर्षीय महिला नागपूर येथील सतरंजीपुरा येथे अंत्यसंस्काराला गेली होती. एक-दोन दिवस राहून स्वतःच्या गावी चौदामैल येथे परत आली. राष्ट्रीय महामार्गावर तिच्या मुलाचे मोबाईल शॉप आहे. ती नेहमीच दुकानात बसायची. त्यामुळे ती वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कात येत होती. 4 जूनला तिची प्रकृती खराब झाली. तिला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तिचे लक्षण बघून त्यांना नागपूर येथील मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करून कोरोना चाचणी करण्यात आली. शनिवारी या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने कळमेश्वर तालुका येथील आरोग्य विभागाच्या अधिकारी डॉ. दीपाली कुलकर्णी (तालुका आरोग्य अधिकारी कळमेश्वर) या चमूसह घटनास्थळी पोहोचल्या.
हे नक्‍कीच वाचा : कोरोनातून सावरलेल्या नागपूरच्या या व्यक्‍तीने केले "प्लाझमा' दान

23 लोकांना क्वारंटाइन
खंडविकास अधिकारी महेश्वर डोंगरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मारोती मुळूक, सहायक पोलिस निरीक्षक राजू कर्मलवार, आरोग्य विस्थार अधिकारी दिनू गतफने, तहसीलदार सचिन यादव हे घटनास्थळी पोहोचले व सर्व माहिती घेऊन तिन्ही परिवारांतील व परिसरातील संपर्कात येणाऱ्या 23 लोकांना शनिवारी नागपूर येथील आमदार निवासला क्वारंटाइनकरिता पाठविण्यात आले. त्यापैकी मुलगा व सून यांचा पॉझिटिव्ह अहवाल मिळाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two "positives" at fourteen miles ...