लग्नानंतरच दीड वर्षात झाले पतीचे निधन, तरीही खिचडी शिजविली तिथेच गाठले नगराध्यक्षपद

रूपेश खैरी
Wednesday, 13 January 2021

सुचिता रमेश मडावी यांचा जन्म देवळी येथे १९७८ मध्ये झाला. त्यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले. बारावीनंतर त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर अवघ्या दीड वर्षातच पतीचे निधन झाले.

वर्धा : नगर परिषदेतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार शिजविणाऱ्या सुचिता मडावी यांचा सामाजिक आणि राजकीय प्रवास चित्तथरारक आहे. ज्या नगर परिषदेत खिचडी शिजविली त्याच नगर परिषदेच्या अध्यक्ष आहेत. अत्यंत गरीब कुटुंबातून आलेल्या सुचिता यांचा सामाजिक आणि राजकीय प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे. 

हेही वाचा - काय म्हणावं याला? मृत बाळांच्या घरी पेटल्या नाही चुली अन् सांत्वनासाठी आलेल्या मंत्र्यांच्या...

सुचिता रमेश मडावी यांचा जन्म देवळी येथे १९७८ मध्ये झाला. त्यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले. बारावीनंतर त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर अवघ्या दीड वर्षातच पतीचे निधन झाले. आठ महिन्याच्या मुलाची जबाबदारी त्यांच्यावर आली. पण, त्यांनी येणाऱ्या संघर्षाला न घाबरता कार्याला सुरुवात केली. याच काळात त्यांना नगर परिषदेच्या शाळेत लहान मुलांना शिकविण्याचे काम मिळाले. येथे तीनशे रुपये महिना मिळायचा. त्या थोड्या पैशात घरखर्च भागत नसल्यामुळे बचत गटातर्फे खिचडी शिजविण्याचे काम केले. 

हेही वाचा - घरात लक्ष्मी आली म्हणून बाप वाटत होता पेढे, पण एक फोन आला अन् सर्वच संपलं

हे काम करत असताना शाळेतील मुख्याध्यापक मोहोड मॅडम यांनी आरडीच्या माध्यमातून लोकांच्या घरापर्यंत पोहोचण्याचा सल्ला दिला. यावेळी नागरिकांच्या समस्या डोळ्यासमोर येत असताना आपल्या अडचणी हलक्‍या वाटायला लागल्या. येथूनच नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रवास सुरू झाला. नागरिकांच्या समस्या सोडविताना वेळ कसा निघायचा हे कळले नाही. लोकांशी संपर्क आणि समाजकार्याची जाण असल्यामुळे खासदार रामदास तडस यांनी नगरसेवक या पदाची निवडणूक लढविण्यास मदत केली. त्यांच्या नेतृत्वाखाली विजयही मिळाला. यात पाच वर्षे नगरसेविका म्हणून कार्य केले. त्यानंतर दुसऱ्यांदा नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली आणि थेट जनतेने या पदावर बसविले. आज त्या नगराध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. 

हेही वाचा - तुम्हालाही इंजेक्शनची भीती वाटतेय? मग आता काळजी नको; विद्यार्थ्याने शोधलाय हटके उपाय
तळागळातील लोकांची सेवा करण्याचे मनात होते. ती संधी लोकांनाच मला दिली. त्यांच्या प्रेमामुळे समाजात जनजागृती करण्याचे काम सुरू आहे. 
-सुचिता मडावी, नगराध्यक्ष, देवळी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: suchita madavi got success even in very poor financial condition in deoli of wardha