
यासाठी त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची स्तुती केली. ई टेंडर, ई बॅंकिंग, ई दरोडा असे प्रकार आता वाढला आहे. यावर नियंत्रण मिळवण्याचे काम हे पोलिस स्टेशन करणार असल्याचे ते म्हणाले.
नागपूर : माणसाचा स्वभाव हा वाघासारखा असला पाहीजे. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे जगाव तर वाघासारख. त्यामुळेच आमचा झेड्यावरसुद्धा वाघाचा लोगो आहे. त्यामुळेच वाघाला साजेसे काम करणे गरजेचे झाले आहे. वाघासारखे काम केल्यानंतर ‘वाघ आला रे वाघ आला’ असे म्हटले तरी विरोधकांची दाणादाण उडेल, असा मिश्कील टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला.
नागपूर शहरालगतच असलेल्या ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाचे’ उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंगळवारी, २६ जानेवारीला झाले. यावेळी संवाद साधताना ते बोलत होते. तत्पूर्वी, विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. विशेष विमानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुपारी ३.१५ वाजताच्या सुमारास त्यांचे आगमन झाले.
अधिक माहितीसाठी - वाढदिवसाला नातेवाईक बसले जेवायला; बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन
सर्वप्रथम उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. नागपुरात नुकतेच सायबर पोलिस स्टेशनचे उद्घाटन करण्यात आले. असे पोलिस स्टेशन फक्त महाराष्ट्रात असल्याचे ते म्हणाले.
यासाठी त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची स्तुती केली. ई टेंडर, ई बॅंकिंग, ई दरोडा असे प्रकार आता वाढला आहे. यावर नियंत्रण मिळवण्याचे काम हे पोलिस स्टेशन करणार असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमाला पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सुनील केदार, संजच राठोड, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास, महापौर दयाशंकर तिवारी, राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार कृपाल तुमाने, आमदार आशीष जैस्वाल, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी.,
जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, नागपूर महानगर विकास प्राधिकरणाच्या आयुक्त शीतल तेली-उगले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पोलिस अधीक्षक (ग्रामीण) राकेश ओला, डॉ. बसवराज तेली, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा आदींची उपस्थिती होती.
१९१४ हेक्टर वनक्षेत्रावर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणी उद्यान साकारले आहे. देशातील अशाप्रकारचे हे सर्वात मोठे प्राणी उद्यान असून, विदर्भातील पर्यटकांसाठी हे नवे पर्यटनस्थळ ठरणार आहे. प्राणी उद्यानात वाघ, अस्वल, बिबट आणि तृणभक्षी प्राणी सफारीचे काम पूर्ण झाले आहे. वन्यप्राणी या उद्यानात स्थलांतरित करण्यात आले आहेत. यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होणार आहेत. वन्यजीव संवर्धन, पुनर्वसनासह संशोधन व शिक्षण याबाबतही येथे लवकरच सुविधा निर्माण करण्यात येणार आहे.
जाणून घ्या - VIDEO : '...तर काँग्रेस अन् राष्ट्रवादीमधील अर्धे नेते तुरुंगात जातील'
प्राणी - संख्या
वाघ - २ (राजकुमार आणि वाघीण ली)
बिबट - ७
अस्वल ः ६
निलगाय - १४
चितळ - ४
प्रवेश शुल्क - वातानकूलित बेंझ बस - आयशर वातानुकूलित बस - साधी बस तृणभक्षक प्राणी (स्वागत दर म्हणून सध्या २० टक्के सूट)
दर - प्रत्यक्ष - सूट - प्रत्यक्ष - सूट - प्रत्यक्ष- सूट
आठवड्यातील पाच दिवस ः ३०० - २४० - २००- १६० - १०० - १००
शनिवार आणि रविवार - ४००- ३२० - ३०० - २४० - १०० - १००
उन्हाळा - १५ मार्च ते १५ जून - ७.३० ते ११.३० वाजता
दुपारी ३.३० ते ६.३० वाजता
हिवाळा - १६ जून ते १४ मार्च ८.३०ते ५.३० वाजेपर्यंत