'आता मुंबई अन् नागपूर एकत्र, विदर्भावर होऊ देणार नाही अन्याय'

टीम ई सकाळ
Monday, 4 January 2021

विधान परिषद सभापती व विधानसभा अध्यक्ष यांचा समावेश असलेल्या मंडळाने विधान भवन नागपूर येथील कार्यालय वर्षभरासाठी सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज नागपूर येथे विधानमंडळ सचिवालयाच्या नव्याने कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.

नागपूर : नागपुरात विधिमंडळाचे कायमस्वरूपी कार्यालय सुरू झाल्याने मुंबई व नागपूर हे एकत्र आले आहेत. आता मुंबई व नागपूरचे नाते अधिक दृढ होईल. विदर्भावर अन्याय होऊ देणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. सोमवारी विधीमंडळ सचिवालयाच्या नव्या कक्षाचे आॅनलाईन उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते व्हिडिओ कॉन्फसिंगद्वारे बोलत होते.

महाराष्ट्र विधानमंडळाचे प्रतिवर्षी नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनानंतर विधानमंडळ सचिवालयाचे कार्यालय बंद करून विधान भवन, मुंबई येथे सुरू करण्यात येते. नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वगळता उर्वरित कालावधीत कार्यालय कामकाजासाठी बंद असते.

अधिक वाचा - पुणे- नागपूर शिवशाहीत आढळलं संशयास्पद पार्सल; चालकानं बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन

विधान परिषद सभापती व विधानसभा अध्यक्ष यांचा समावेश असलेल्या मंडळाने विधान भवन नागपूर येथील कार्यालय वर्षभरासाठी सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज नागपूर येथे विधानमंडळ सचिवालयाच्या नव्याने कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.

विदर्भवादी नेहमी माझ्या हृदयाजवळ आहेत. विदर्भावर अन्याय होऊ देणार नाही. अन्याय होत असल्यास ढाल बनून समोर राहू, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. कुणाला अधिकार केंद्र स्थानी हवे असताना आम्ही विकेंद्रीकरण केले, असेही ते म्हणाले.

सर्वांचा विकास विचार झाल्यास मागास्पनाची भावना राहणार नाही. पुण्यात ही कक्ष सुरू करणार आहे. अधिवेशन न होने हे भूशवाह नाही, असे नाना पटोले म्हणाले. यापुढे विधिमंडळ समितीच्या बैठका होतील. अर्थ संकल्पीय अधिवेशन नागपूरला घ्यावे. नवीन मुख्यालय नागपूरला यावे, असे नितीन राऊत म्हणाले.

सविस्तर वाचा - '...तर १५ जानेवारीपासून राज्यातील शाळा ठेवणार बंद'

विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आदी मान्यवरांसह प्रमुख उपस्थितीत तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऑनलाईन उपस्थितीत हा उद्घाटन समारंभ पार पडला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: udhav thakare says We will not allow injustice to happen to Vidarbha