यंदा सजलाच नाही हा बाजार : कोट्यवधींचा व्यवसाय बुडाला

chhatri
chhatri

नागपूर  : पावसाला सुरूवात झाली की, बाजारपेठ रंगीबेरंगी छत्र्यांनी सजते. यंदा मात्र कोरोनाच्या संकटामुळे छत्र्यांची बाजारपेठ थंडबस्त्यात आहे. त्यामुळे छत्री व्यवसायिकांच्या उत्पन्नावरच पाणी फेरले आहे. 

दरवर्षी पावसाला सुरूवात झाली की, बाजारपेठेत छत्री, रेनकोट विकणाऱ्यांची व ग्राहकांची गर्दी उसळते. यंदा कोरोनाच्या संकटामुळे लोक अजून घराबाहेर पडलेले नाहीत. त्यामुळे इतर व्यवसायांप्रमाणेच छत्री उद्योगाला फटका बसला असून, दरवर्षी सुमारे 22 कोटींच्या वर उद्योग करणारा हा व्यवसाय यंदा मात्र ठप्प आहे.

छोटा भीम, मोटू-पतलू, डोरेमॉन, चुटकी, झुझु आदी कार्टून्सचे चित्र असेलल्या छत्र्या गेल्यावर्षी तुफान विक्री झाल्याचे छाताबाजारचे महमद भाई म्हणाले. गेल्या तीस वर्षांपासून छत्र्यांची विक्री करणाऱ्या महोम्मद भाईंनी इतका वाईट काळ यापूर्वी कधीही अनुभवलेला नव्हता. कॉलेजच्या मुलींसाठी खास फॅन्सी डिझाइन मधील छत्री, बाइकस्वारांसाठी विविध प्रकारातील रेनकोट खरेदी करण्यासाठी दरवर्षी त्यांच्याकडे मोठी गर्दी व्हायची, यंदा मात्र झाली नाही.

विक्री पाठोपाठ दरही घसरले 
अनु. छत्र्यांचे प्रकार मागीलवर्षी     यंदा
1 बारा काडी छत्री 150 ते 200 120 ते 150
2 आठ काडी छत्री 120 ते 160 80 ते 120 
3 फोल्डिंग छत्री  120 ते 200 85 ते 140 
4 जम्बो फोल्डिंग छत्री  200 ते 240 160 ते 170 
5 थ्री फोल्ड छत्री 300 ते 250 200 ते 250 
6 लहान मुलांच्या छत्री 100 ते 120 40 ते 100 
7 लहान मुलांचे रेनकोट 200 ते 300 180 ते 250
8 फॅन्सी रेनकोट 300 ते 650 250 ते 650

या दिवसांत विविध रंगांच्या, आकारांच्या छत्र्या व रेनकोटमुळे दुकानात स्वत:हून ग्राहक यायचे. त्यांनी आजही ग्रामीण भागातील ग्राहकांची आवड असलेल्या आठ काडी, बारा काडी प्रकारातील छत्र्यांना विक्री करणे सोडलेले नाही. शिवाय महिलांना पसंत पडणाऱ्या टू-फोल्ड, थ्री-फोल्ड पद्धतीच्या छत्र्यांना, स्टॉल छत्र्यांना देखील मोठी मागणी असते असे महोम्मद भाई म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com