काय सांगता : अंडरवर्ल्ड डॉन गवळीचा पुन्हा रजेसाठी अर्ज?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जून 2020

कारागृह प्रशासनाला संचित रजा मिळावी म्हणून गवळी याने 30 नोव्हेंबर 2019 रोजी अर्ज केला होता. मात्र, 7 महिन्यांचा कालावधी उलटून देखील प्रशासनाने त्यावर कुठलाही निर्णय घेतला नाही. त्यामुळे, अरुण गवळी याने उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आणि संचित रजा मंजूर करण्याचे आदेश देण्याची विनंती केली.

नागपूर : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याने रजा मिळावी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये पुन्हा याचिका दाखल केली आहे. कारागृह उपमहानिरीक्षकांना संचित रजा (फरलो) मंजूर करण्याचे आदेश देण्यात यावे या विनंतीसह त्याने ही याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने सहा आठवड्यामध्ये उत्तर दाखल करण्याचे आदेश राज्य शासनाला दिले.

याचिकेनुसार, कारागृह प्रशासनाला संचित रजा मिळावी म्हणून गवळी याने 30 नोव्हेंबर 2019 रोजी अर्ज केला होता. मात्र, 7 महिन्यांचा कालावधी उलटून देखील प्रशासनाने त्यावर कुठलाही निर्णय घेतला नाही. त्यामुळे, अरुण गवळी याने उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आणि संचित रजा मंजूर करण्याचे आदेश देण्याची विनंती केली. गवळी नुकताच अभिवचन रजा (पॅरोल) पूर्ण करुन 3 जून रोजी नागपूरच्या मंध्यवर्ती कारागृहामध्ये क्षरण आला आहे.

महापौर निर्णयावर ठाम, मुंढेंच्या पत्राला बगल, वाचा काय आहे प्रकरण

लॉकडाऊनचे कारण देत दोन वेळा नागपूर खंडपीठामध्ये अर्ज दाखल करुन त्याने ती रजा वाढवून घेतली होती. तर, आज संचित रजा मिळावी म्हणून पुन्हा नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली. त्यानुसार, न्यायालयाने सहा आठवड्यांमध्ये उत्तर दाखल करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहे. गवळीतर्फे ऍड. मीर नगमान अली यांनी बाजू मांडली. या प्रकरणी न्यायमूर्ती रवी देशपांडे आणि न्यायमूर्ती विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Underworld don Gawli's application for leave again