युनिसेक्‍स सलून व स्पा सेंटरमधून "ती' करायची देहव्यापार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

मनीषा कडवे ही स्पा सेंटरच्या नावे कुंटणखाना चालवीत होती. अल्पवयीन तसेच महाविद्यालयीन तरुणींना झटपट पैसे कमविण्याचे आमिष दाखवत होती. त्यानंतर त्यांना देहव्यापारात ओढत होती.

नागपूर : गुन्हेशाखेच्या युनिट चारने मनीषनगर येथील जयंतीनगरी परिसरातील मून युनिसेक्‍स सलून ऍण्ड स्पा सेंटरमध्ये छापा टाकून देहव्यापार उघडकीस आणला. पोलिसांनी स्पा सेंटरची संचालिका मनीषा तुकाराम कडवे उर्फ जास्मीन अविराज क्रेस्टी (वय 30, रा. त्रिमूर्ती चौक, उमरेड) व दलाल अरविंद मोहनलाल मसी (वय 30, रा. वैभवनगर, वाडी) या दोघांना अटक करून देहव्यवसाय करणाऱ्या दोन तरुणींना ताब्यात घेतले. 

वॉट्‌सऍपवर अश्‍लील फोटो

मनीषा कडवे ही स्पा सेंटरच्या नावे कुंटणखाना चालवीत होती. अल्पवयीन तसेच महाविद्यालयीन तरुणींना झटपट पैसे कमविण्याचे आमिष दाखवत होती. त्यानंतर त्यांना देहव्यापारात ओढत होती. त्यांचे अर्धनग्नावस्थेत फोटो काढून वॉट्‌सवरून ग्राहकांना पाठवित होती. फोटोवरून निवड केलेल्या मुलीला ती ग्राहकांकडे पाठवित होती.

 

अवश्‍य वाचा- जागलीसाठी काका-पुतण्या शेतात गेले आणि पुतण्यासोबत घडले असे...

 

कुंटणखान्यावर छापा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा कडवे ही स्पा सेंटरच्या नावे कुंटणखाना चालवीत असल्याची माहिती गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक अशोक मेश्राम यांना मिळाली. पोलिस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक मेश्राम, सहायक उपनिरीक्षक किरण चौगले, उपनिरीक्षक पुरुषोत्तम मोहेकर, नागोराव इंगळे, रमेश उमाठे, देवेंद्र चव्हाण, सुधाकर धंदर, नितीन आकोते, सचिन तुमसरे व आशीष क्षीरसागर यांनी सापळा रचून सेंटरमध्ये छापा टाकला. पोलिसांनी दोघांना अटक करून दोन पीडित तरुणींची सुटका केली. पोलिसांनी त्यांच्या कडून दोन मोबाइल व रोख जप्त केली. दोघांविरुद्ध बेलतरोडी पोलिस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. 

 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: From Unisex salon and spa center she does Sex business