नागपूरकरांनो कोरोनाची अद्ययावत माहिती पाहिजे? मग वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जून 2020

कोरोनासंदर्भात अद्ययावत माहिती देणारी नागपूर महानगरपालिका देशातली बहुदा पहिली ठरली आहे.

नागपूर : नीरी आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम देहरादूनच्या सहकार्याने डॅशबोर्ड तयार केला आहे. याची लिंक मनपाच्या वेबसाईट www.nmcnagpur.gov.in वर उपलब्ध आहे. या लिंकच्या आधारे नागपुरातील कोविड-19 ची अद्ययावत माहिती 3-डी मध्ये उपलब्ध होणार आहे.

नागपुरात बहरले सोनू सूदचे प्रेम; शंकरनगरातील ब्रेड पकोडा व कटिंग चहाचा होता दिवाना 

कोरोनासंदर्भात अद्ययावत माहिती देणारी नागपूर महानगरपालिका देशातली बहुदा पहिली ठरली आहे. नागपूर महापालिकेनी नीरी, आई.आई.पी. आणि स्मार्ट सिटी सोबत घेतलेली ही मोठी भरारी आहे. यावेळी नीरीचे संचालक डॉ. राकेशकुमार, मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, नीरीचे मुंबई झोनल प्रमुख आणि वरिष्ठ मुख्य वैज्ञानिक डॉ. रितेश विजय, प्रकल्प सहायक कौस्तुभ जिचकार व स्मार्ट सिटीचे महाव्यवस्थापक शील घुले उपस्थित होते. आय.आय.पी.चे सुनील पाठक यांचेही यात सहकार्य लाभले. 

संगणकाचे बटण दाबून महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कोविडसंदर्भातील अद्ययावत माहितीसाठी तयार करण्यात आलेल्या डिजिटल सर्व्हिस व डॅशबोर्डचे लोकार्पण केले. तंत्रज्ञानाचा वापर करून कोविडसंदर्भातील माहिती नागरिकांना सहज उपलब्ध व्हावी, यासाठी मनपा प्रयत्नरत आहे.

झाड केले कमी उंच, फळे झाली टंच!   

गुगल अर्थचा वापर करून आता एका क्‍लिकवर कोविडची माहिती थ्रीडी इमेजेसमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. देशातील अन्य शहरे यापासून प्रेरणा घेऊन कोविडचा बदल नागरिकांना माहिती देऊ शकतात. ही तर एक सुरुवात आहे. नीरीच्या सहकार्याने मनपा आपली शाळा, उद्याने, कार्यालये आदींची माहिती अशा प्रकारे नागरिकांसाठी उपलब्ध करून देणार असल्याचे यावेळी मुंढे यांनी सांगितले. 

कोविडची संपूर्ण माहिती एका क्‍लिकवर उपलब्ध व्हावी, त्याचा उपयोग करून नागरिकांनी कोरोनापासून सतर्क राहावे याकरिता महापालिकेने गुगल अर्थ ऍप्लिकेशनचा वापर करीत एक थ्रीडी डिजिटल सर्व्हिस तयार केली आहे. त्यामुळे एका डॅशबोर्डवर कोविडची अद्ययावत माहिती उपलब्ध होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: updated information of covid-19 avilable on nmc website