esakal | भाजप, महाआघाडीच्या मंत्र्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी; बावनकुळेंच्या आरोपांवर वडेट्टीवारांचा सवाल
sakal

बोलून बातमी शोधा

Vadettiwars question on Bavankules allegations

राष्ट्रवादीच्यावतीने प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे यांनी रिकामे असल्याने बावनकुळे पक्षश्रेष्ठींची खुशामत राखण्यासाठी बेताल वक्तव्य करीत असल्याचा आरोप केला. साईबाबा कंपनी कोण चालवते, वीस कोटींचे झाडं लावायला दिले ते ठेकेदार कोण होते? कुणाचे नातेवाईक? झाडे कुठे लावली याची चौकशी करण्याची मागणी कुंटे यांनी केली.

भाजप, महाआघाडीच्या मंत्र्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी; बावनकुळेंच्या आरोपांवर वडेट्टीवारांचा सवाल

sakal_logo
By
राजेश चरपे

नागपूर : भाजप आणि महाआघाडीच्या मंत्र्यांमध्ये सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहे. माजी मंत्री बावनकुळे यांनी केलेल्या वैयक्तिक आरोपाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते चांगलेच खवळले आहेत. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ‘जगदंबा कन्स्ट्रक्शन कंपनी’ कोणाची असा सवाल करून त्यांना एकप्रकारे इशाराच दिला.

राज्यात सर्वत्र जिल्हा प्रशासनाला हाताशी धरून वाळू चोरी, तस्करी व अवैध धंदे सुरू आहेत. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी अवैध धंद्यासाठी जिल्हे वाटून घेतले आहेत. यात विदर्भातील मंत्र्यांचाही समावेश आहे असा आरोप बावनकुळे यांनी केला होता. त्याचा वडेट्टीवार यांनी चांगलाच समाचार घेतला.

हेही वाचा - जेवण बेतले जीवावर; शहराबाहेर जेवण करण्यास गेलेल्या युवकांचा जागीच मृत्यू 

सर्वाधिक ‘कार्यक्षम’मंत्री असताना भाजपने विधानसभेत उमेदवारी का दिली नाही, याचा बावनकुळे यांनी विचार करावा. कोल वॉशरीचे ठेके आणि विदेशात केलेली गुंतवणूक कोणी केली याचेही उत्तर द्यावे, असे वडेट्टीवार म्हणाले.

राष्ट्रवादीच्यावतीने प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे यांनी रिकामे असल्याने बावनकुळे पक्षश्रेष्ठींची खुशामत राखण्यासाठी बेताल वक्तव्य करीत असल्याचा आरोप केला. साईबाबा कंपनी कोण चालवते, वीस कोटींचे झाडं लावायला दिले ते ठेकेदार कोण होते? कुणाचे नातेवाईक? झाडे कुठे लावली याची चौकशी करण्याची मागणी कुंटे यांनी केली.

सविस्तर वाचा - दुर्दैवी! फराळाचे पदार्थ करताना अचानक घरात पसरला धूर आणि क्षणाधार्त संसाराची झाली राखरांगोळी

जाहीर माफी मागावी

बावनकुळे यांनी आरोपाचे पुरावे द्यावे अन्यथा सरकारची जाहीर माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केली. वीज बिलात दुरुस्ती करून वीज माफी करू, सवलत देऊ असे आश्वासन ऊर्जामंत्री यांनी दिले होते असे सांगून आता घुमजाव केल्याचा आरोपही बावनकुळे यांनी केला होता.

संपादन - नीलेश डाखोरे