शिवरात्रीपर्यंत मिळणार स्वस्त भाजीपाला, जाणून घ्या दर

राजेश रामपूरकर
Sunday, 10 January 2021

ढगाळ वातावरण आणि अवेळी आलेल्या पावसामुळे भाजीपाला उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे दर्जेदार भाजीपाल्याची आवक मंदावली असली, तरी सध्या १८० ते २०० गाड्यांची आवक सुरू आहे.

नागपूर : ठोक बाजारात मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने शिमला मिरची, कारले, गवारशेंगा वगळता जवळपास सर्व भाज्यांच्या दरात घट झाली आहे. पानकोबी, फुलकोबी, टोमॅटो, मेथी, पालक, कोथिंबरचे भाव घसरले आहे. वाढत्या महागाईत भाजीपाला स्वस्त झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. हीच स्थिती शिवरात्रीपर्यंत राहण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा - एकाचवेळी पाच बालकांना हातात घेऊन शूर परिचारिकेची आगीतून धाव, मेयोमधील घटनेची अनेकांना आठवण

ढगाळ वातावरण आणि अवेळी आलेल्या पावसामुळे भाजीपाला उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे दर्जेदार भाजीपाल्याची आवक मंदावली असली, तरी सध्या १८० ते २०० गाड्यांची आवक सुरू आहे. शिमला मिरची, वाटाण्यांच्या शेंगा वगळता इतर भाज्या स्थानिक शेतकऱ्यांकडून येत आहेत. परिणामी भाजीपाल्याच्या दरातही मोठी घसरण पाहण्यास मिळत आहे, असे घाऊक भाजीविक्रेते राम महाजन यांनी सांगितले. 
हिरवी मिरचीही स्वस्त झाली असून, २० ते २५ रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे. यासह टोमॅटो १५ रुपये, वांगे १५ रुपये, काकडी २० रुपये, भेंडी २० रुपये, कारले ३० रुपये, दुधी भोपळा २० रुपये किलो, असा सध्या भाव असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. 

हेही वाचा - तब्बल १५ वर्षांनी झालं तिसऱ्या पाहुण्याचं आगमन अन्...

भाजीपाला प्रति किलोचे दर (घाऊक बाजार) 
वांगे १५ रुपये 
टोमॅटो १५ रुपये 
फुलकोबी १५ रुपये 
पानकोबी ०८ रुपये 
चवळीच्या शेंगा ३० रुपये
कारले ३० रुपये 
गवार शेंगा ३० रुपये 
पालक १० रुपये 
मेथीची भाजी २० रुपये
कोहळा ३० रुपये
शिमला मिरची ३० रुपये 
कोथिंबीर २० रुपये 
भेंडी ३० रुपये 
दुधी भोपळा २० रुपये
काकडी २० रुपये 
मुळा १० रुपये
गाजर २० रुपये 
तोंडले ३० रुपये

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vegetables rates decreases in nagpur