शाब्दिक चकमक : ‘हा काही झोलबा पाटलांचा वाडा नाही’ कोणी केले हे विधान

नीलेश डोये
Sunday, 24 January 2021

कुणी विषय मांडले. त्याचे पुढे काय झाले; याबाबत काहीही देणे-घेणे नाही, असा हा काही प्रकार पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांच्या होत होता. आता नाही. हा काही झोलबा पाटलांचा वाडा नाही’, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

नागपूर : या पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांच्या काळात गैरव्यवहार होत होता. इतिवृत्तात काहीही येत होते. आता तसे राहिले नाही. हा काही झोलबा पाटलांचा वाडा नाही, असे म्हणत उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. झोलबा पाटलावरून जिल्हा परिषदच्या सभेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये शाब्दीक चकमक उडाली.

सदस्यांनी उपस्थित केलेले प्रश्न, मुद्दे इतिवृत्तात योग्यप्रकारे मांडले जात नाही. अनेकदा त्यात चुका असतात. एकच विषय वेगवेगळ्या प्रकारे मांडण्यात येत असल्याची तक्रार काही सदस्यांनी केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्य सुचिता ठाकरे म्हणाल्या, जुलै व ऑक्टोबर महिन्यात पार पडलेल्या सभेमध्ये काही विषय उपस्थित केले होते.

जाणून घ्या - स्वयंपाक करताना महिलेला अचानक आली दुर्गंधी अन् क्षणात उध्वस्त झाला सुखी संसार; परिसरात हळहळ

परंतु, त्या सर्व विषयांमधून केवळ एक विषय या विषयपत्रिकेत घेण्यात आला, तो ही चुकीच्या पद्धतीने. इतर विषय यात आहेच नाहीच. आमचे विषय घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला. 

तर भाजप सदस्य राधा अग्रवालसह इतरही काही सदस्यांनी त्यांचे विषय विषय पत्रिकेवर घेतले जात नसल्याची तक्रार केली. यावर उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी नाराजी व्यक्त करीत यापुढे सर्व सदस्यांना सभेत मांडलेल्या प्रश्नांचे उत्तर हे पोस्टाव्दारे पोहोचविण्याची व्यवस्था करण्याची सूचना केली.

कुणी विषय मांडले. त्याचे पुढे काय झाले; याबाबत काहीही देणे-घेणे नाही, असा हा काही प्रकार पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांच्या होत होता. आता नाही. हा काही झोलबा पाटलांचा वाडा नाही’, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

जाणून घ्या - मुलाला खटकले आईचे प्रेमसंबंध अन् उचलले धक्कादायक पाऊल, आईने काढली समजूत

आमच्या काळात नव्हता
झोलबा पाटलाचा वाडा आता झाला आहे. आमच्या काळात नव्हता.
- अनिल निधान,
विरोधी पक्ष नेते, भाजप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Verbal clash between the ruling party and the opposition in the Zilla Parishad