अरे बापरे! कामठीत हे चाललंय काय? फोफावतोय देहव्यवसाय.. कोणाचं होतंय दुर्लक्ष? वाचा सविस्तर

सतीश डाहाट
Thursday, 13 August 2020

काही परवाना धारक लॉज, कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या कळमना मार्गावर, खैरी गावाच्या कडेला, गुमथळा मार्गावर तसेच अनधिकृत असलेल्या पॉश बिल्डिंग मध्ये विश्रांती थांबाच्या नावावर गुप्तचर पद्धतीने सुरू असलेल्या देहव्यवसायाला उधाण आले असून स्थानिक पोलिसांच्या अभयपणामुळे हे देहव्यावसाय चांगलेच फावले आहे.

कामठी (जि. नागपूर) : नागपूर शहर पोलिस आयुक्तालयात येणाऱ्या काही परिसरात गुप्तचर पद्धतीने सुरू असलेल्या देह व्यवसाय अड्यावर धाड टाकत पर्दाफाश करत कित्येक देहव्यवसाय उघडकीस आणण्यात सामाजिक सुरक्षा पथक तसेच पोलिस विभागाला यश प्राप्त झाले असले तरी नागपूरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आणि नागपूर शहर पोलिस आयुक्तालयातील परिमंडळ क्र ५ अंतर्गत येणाऱ्या कामठी शहरात काही भलतेच प्रकार सुरु आहेत.

काही परवाना धारक लॉज, कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या कळमना मार्गावर, खैरी गावाच्या कडेला, गुमथळा मार्गावर तसेच अनधिकृत असलेल्या पॉश बिल्डिंग मध्ये विश्रांती थांबाच्या नावावर गुप्तचर पद्धतीने सुरू असलेल्या देहव्यवसायाला उधाण आले असून स्थानिक पोलिसांच्या अभयपणामुळे हे देहव्यावसाय चांगलेच फावले आहे.

हेही वाचा - शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले हे विधान...

बदलत्या काळानुसार संस्कृती लोप पावत असून शहरात व्यभिचाराला वाव मिळत आहे.  दिवसागणिक वाढलेल्या गरजा बघता आर्थिक टंचाई तसेच झटपट श्रीमंतीच्या अपेक्षेमुळे काही गरजवंत तर काही हौशी युवती महिला देह व्यवसायाचा आसरा घेत आहेत. मात्र पोलिस विभाग याकडे डोळेझाक करत असल्याचे चित्र सध्या कामठी शहरात बघायला मिळत आहे.

शहराच्या २० ते २५ किलोमीटर परिसर अंतरावरील गावातील काही तरुणी आणि महिला कामठी येथे येऊन आपले देहजाळ शहरात पसरवत आहेत. या व्यवसायातील अनेक दलाल सक्रिय होऊन कॉलेज तरुणींना आपल्या अडकवून छुप्या देह व्यवसायात अडकवत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी डीसीपी स्कॉड ने रमानगर येथे गेल्या कित्येक महिन्यापासून गुप्तचर पद्धतीने सुरू असलेल्य घरी धाड घालून देह व्यवसाय उघडकीस आणला तसेच मागिल वर्षी कुंभारे कॉलोनी, यशोधरानगर, कामठी नागपूर रोडवरील लॉज आदी ठिकाणी पोलिसांनी धाडी घातलेल्या आहेत. 

पोलिस विभागाचे दुर्लक्ष

काही ठिकाणी हा व्यवसाय राजरोसपणे सुरू असल्याचे पोलिस ठाण्यात आलेल्या तक्रारीवरून निष्पन्न झाले होते. असाच प्रकार नवीन पोलिस ठाण्याच्या हद्दीत नोव्हेंबर महिन्यात घडला होता. त्यानंतर मात्र पोलीस विभागाने ध्रुतराष्ट्र रूप धारण करून वेश्याव्यवसायावर लगाम घालण्यासंबंधीचे कुठलेही ठोस पावले उचलले नाही तर आजही काही पॉश फॉर्म हाऊस वर बिनधास्तपणे देहव्यावसाय सुरू आहे हा व्यवसाय उघड नसला तरी छुप्यापद्धतीने सुरू असलेल्या या व्यवसायावर पोलिसांनी करडी नजर ठेवून या देहव्यावसायाला प्रतिबंध घालणे गरजेचे आहे या व्यवसायाने दिवसगाणिक उग्र रूप धारण केले असून यात अनेक महाविद्यालयीन व गरजवंत तरुणी व महिला गुरफटल्या जात आहेत. 

हेही वाचा - सावधान! पुढील दोन दिवसांत या जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

करडी नजर पण कारवाई मात्र शून्य 

हा व्यवसाय नजरेपलीकडेचा असल्याने पोलिसही याकडे कानाडोळा करीत असतात , नेमके पोलिसांच्या या भूमिकेमुळे देह व्यवसायाला चालना मिळत आहे. येथे हा प्रकार असाच सुरू राहील्यास लवकरच मुंबई पुणे सारख्या शहराच्या रांगेत येण्यास वेळ लागणार नाही करिता पोलीस प्रशासन व स्थानिक सामाजिक संघटनांनी तसेच सुदान नागरिकांनी याकडे लक्ष घालण्याची गरज आहे. या देह व्यवसायासंदर्भात शहरातील काही जागरूक नागरिकांतर्फे पोलिस स्टेशनला निवेदन सुद्धा देण्यात आले होते परंतू उलट त्यांच्याविरोधात उलट गुन्हा दाखल करण्यात आला होता हे विशेष. पोलिसांना कुठे काय सुरू आहे हे माहीत असूनसुद्धा कारवाई मात्र शून्य असल्याने देहव्यावसायला उधाण आले आहे एकीकडे गुन्हेगारी संदर्भात कंबर कसण्यासाठी डीसीपी पथक, डी बी स्कॉड आदी कार्यरत आहेत तरी सुद्धा यांच्या नजरे आड सुरू असलेले देहव्यावसाय पोलिसांना आव्हान देत आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: very bad incidents happening in kamptee near nagpur