esakal | भाजपचा बालेकिल्ला ढासळणार! महाआघाडीचा विजय दृष्टीक्षेपात; वंजारींना हवे अवघे ३,८०० मते
sakal

बोलून बातमी शोधा

The victory of the Grand Alliance is certain

मतमोजणीच्या पाचव्या फेरीअखेर एक लाख ३३ हजार ५३ मतांची मोजणी पूर्ण झाली. तथापि, पसंतीक्रमाच्या या निवडणुकीमध्ये अपेक्षित असणारा ६० हजार ७४७ चा कोटा कोणताही उमेदवार अद्याप पूर्ण करू शकला नाही. १०.३० ते ११ वाजेपर्यंत अंतिम निकाल हाती येण्याची शक्यता आहे. कॉंग्रेसच्या गोटात विजयोत्सवाची तयारी सुरू झाली आहे.

भाजपचा बालेकिल्ला ढासळणार! महाआघाडीचा विजय दृष्टीक्षेपात; वंजारींना हवे अवघे ३,८०० मते

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी सकाळी आठ वाजता सुरू झाली. पहिल्या फेरीत कॉंग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या फेरीतही आघाडी कायम होती. अभिजित वंजारी यांची घोडदौड पाहता भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला ढासळतो की काय, अशा चर्चा आता सुरू झाली आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांना विजयासाठी अवघे ३,८०० मतांची गरज आहे.

दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मोजणीमध्येही कॉंग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी आघाडीवर आहेत. त्यांचा विजय दृष्टीक्षेपात आला असून, विजयासाठी आता केवळ ३,८०० मतांची आवश्‍यकता आहे. पहिल्या फेरीमध्ये अभिजित वंजारी यांना ५५,९४७ मते मिळाली, तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संदीप जोशी यांना ४१,५४० मते मिळाली.

सविस्तर वाचा - कडाक्याच्या थंडीत वाढली हुरड्याची रंगत; चुलीवरच्या जेवणासाठी गावाकडे धूम

दुसऱ्या फेरीची मतमोजणी सध्या सुरू आहे. यामध्ये वंजारी यांनी १००० मतांची आघाडी घेतली असून, त्यांना मिळालेली एकूण मते ५६,९४७ झाली आहे. तर संदीप जोशी यांना आतापर्यंत ४१,६५२ मते मिळाली आहेत. ६०,७४७ मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी वंजारींना आता केवळ ३,८०० मतांची आवश्‍यकता आहे. त्यामुळे ते विजयाच्या अगदी समीप आले आहेत.

मतमोजणीच्या पाचव्या फेरीअखेर एक लाख ३३ हजार ५३ मतांची मोजणी पूर्ण झाली. तथापि, पसंतीक्रमाच्या या निवडणुकीमध्ये अपेक्षित असणारा ६० हजार ७४७ चा कोटा कोणताही उमेदवार अद्याप पूर्ण करू शकला नाही. १०.३० ते ११ वाजेपर्यंत अंतिम निकाल हाती येण्याची शक्यता आहे. कॉंग्रेसच्या गोटात विजयोत्सवाची तयारी सुरू झाली आहे.

क्लिक करा - बंगल्यामागे आढळली मानवी मृतदेहाची कवटी; ओळख पटताच उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप

वंजारींचा विजय ठरणार इतिहास

पदवीधर मतदारसंघ भाजपचा गड मानला जातो. अभिजित वंजारी यांनी या निवडणुकीसाठी मोठा संघर्ष केला आहे. दीड ते दोन वर्षांपूर्वीच त्यांची निवडणूक सुरू झाली होती. या निवडणुकीत त्यांच्या विजय झाल्यास हा मोठा इतिहास ठरणार आहे. कारण, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह भाजपच्या दिग्गज नेत्यांना या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे सर्व संघटना आणि राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांसह नागरिकही रात्र जागून अंतिम निकालाची वाट बघत आहेत.

संपादन - नीलेश डाखोरे

go to top