
बाळासाहेब ठाकरे विदर्भ विरोधी होते. वेगळा विदर्भ देण्यास त्यांचा विरोध होता. म्हणून विदर्भातील प्राणी संग्रहालयाला विदर्भातील दुसऱ्या कोणत्याही नेत्याचे नाव दिले तरी चालेल. परंतु विदर्भ विरोधी नेत्याचे नाव नको, अशी भूमिका घेत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या युवा आघाडीतर्फे जीआर जाळून निषेध करण्यात आला.
नागपूर ः नागपूर शहरापासून वाघ्या काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या गोरेवाडा उद्यानाला ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय’, असे नाव देण्याचा निर्णय शासनानं घेतला. येत्या मंगळवारी म्हणजेच प्रजासत्ताकदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्राणी संग्रहालयाचे उद्धाटन करणार आहेत. पण आता यावरून वाद पेटला आहे.
नक्की वाचा - जन्मदाता बापच करत होता घृणास्पद कृत्य; अखेर दिरानं उचलला विडा अन् घडला थरार
बाळासाहेब ठाकरे विदर्भ विरोधी होते. वेगळा विदर्भ देण्यास त्यांचा विरोध होता. म्हणून विदर्भातील प्राणी संग्रहालयाला विदर्भातील दुसऱ्या कोणत्याही नेत्याचे नाव दिले तरी चालेल. परंतु विदर्भ विरोधी नेत्याचे नाव नको, अशी भूमिका घेत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या युवा आघाडीतर्फे जीआर जाळून निषेध करण्यात आला. युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर यांच्या नेतृत्वात गिरीपेठ येथील समितीच्या मुख्य कार्यालय परिसरात झालेल्या या आंदोलनाला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागपूर जवळ गोरेवाडा येथे साकारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात जनतेला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने प्रकल्प आराखडा बनविण्यात आला आहे. गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान हे व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र वनविकास महामंडळ, नागपूर यांच्या अखत्यारीत असून तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सफारी व सुविधा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे.
जवळपास 2 हजार हेक्टर वन क्षेत्रावर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणी उद्यान साकारण्यात येत असून यामधील महत्त्वाची कामे महाराष्ट्र वनविकास महामंडळ, नागपूर यांच्याकडून पूर्ण करण्यात आलेली असल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी काल दिली होती. आज विदर्भवाद्यांनी जीआर जाळला. त्यामुळे २६ जानेवारीला होणाऱ्या कार्यक्रमाच्या वेळीही विरोध प्रदर्शन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
संपादन - अथर्व महांकाळ