शेतमाल तेजीमागे कृषी कायदे नाहीत तर अर्थशास्त्र : विजय जावंधिया

टीम ई सकाळ
Tuesday, 26 January 2021

यावर्षी हंगामाच्या सुरवातीला ५००० ते ५२०० रुपयांचा दर कापसाला होता. ज्यावेळी कापसाचे हमीभाव दर ५६०० ते ५८२५ रुपये आहेत. परिणामी हंगामाच्या सुरुवातीला सीसीआयवर कापूस खरेदी करीता दबाव वाढला होता.

नागपूर : सोयाबीनसह कापसाला खुल्या बाजारात हमीभावापेक्षा जास्त दर मिळत आहे. त्यामागे जागतीकस्तरावरील मागणीत झालेली वाढ हे मुख्य कारण असताना भाजप नेते मात्र केंद्र सरकारने पारीत केलेल्या कृषी कायद्यामुळे दरात तेजी आल्याचा अपप्रचार करीत आहेत. ही देशातील शेतकऱ्यांची दिशाभूल असून ती अभिप्रेत नाही, अशा आशयाचे पत्र शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते तथा कृषी प्रश्‍नाचे अभ्यासक विजय जावंधिया यांनी प्रधामंत्री नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे. 

पत्रानुसार, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ७० वर्षांपासून कॉंग्रेस काळात शेतकऱ्यांचे शोषण होत होते. त्यापासून नव्या कायद्यांमुळे मुक्‍ती मिळणार आहे. शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल बाजार समितीबाहेर विकला येईल. त्यामुळे स्पर्धा वाढेल आणि दरात तेजी येणार आहे. त्याचवेळी बनारस येथील सभेत प्रधानमंत्री म्हणून आपणच तीन लाख कोटी रुपयांचा गहू आणि सहा लाख कोटी रुपयांचे धान तर ६० कोटी रुपयांची दाळ सरकारने हमीभावाने खरेदी केल्याचे जाहिरपणे सांगितले होते.

जाणून घ्या - औषध विक्रेत्याने डॉक्टरला फोन करून सांगितले पैसे पाठवले अन् सरकली पायाखालची जमीन

आपण प्रत्येकवेळी सोयीचे राजकारण केल्याचे दोन्ही व्यक्‍तव्यातील विरोधाभासावरून सिध्द होते. नव्या कृषी कायद्यांमुळे जर शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा अधिकचा दर मिळत असेल तर मग सरकारला हमीभावाने कोट्यावधी रुपयाचा शेतमाल का खरेदी करावा लागला. यावर्षीच्या सुरवातीपासूनच सोयाबीनचे भाव हमीभावापेक्षा अधिक आहेत. कापसाचे दर देखील ५५०० ते ५७०० क्‍विंटल असून ते देखील हमीभावाच्या जवळपास आहेत.

यावर्षी हंगामाच्या सुरवातीला ५००० ते ५२०० रुपयांचा दर कापसाला होता. ज्यावेळी कापसाचे हमीभाव दर ५६०० ते ५८२५ रुपये आहेत. परिणामी हंगामाच्या सुरुवातीला सीसीआयवर कापूस खरेदी करीता दबाव वाढला होता. पंजाबमध्ये सीसीआयने २८ लाख क्‍विंटल कापसाची खरेदी हमीभावाने केली आहे तर व्यापाऱ्यांकडून अवघी ५.५ लाख क्‍विंटल कापसाची खरेदी केली.

जाणून घ्या - VIDEO : '...तर काँग्रेस अन् राष्ट्रवादीमधील अर्धे नेते तुरुंगात जातील'

परंतु, दरातील ही तेजी कृषी कायद्यांमुळे आल्याचा दावा भ्रामक आहे. अमेरिकन बाजारात ७५ सेंट प्रती पाऊंड रुईचे दर ८६ सेंट प्रती पाऊंड झाले आहेत. रुपयांचे अवमुल्यन आणि बाजारात कापसाची कमी आवक ही कारणे कापूस तेजी मागे आहेत. अमेरिकेत सोयाबीन दरातही तेजी आली आहे. सोयाबीनचे दर १२-१३ डॉलर प्रती बुशेलवर पोहोचले. सोयाबीन दरातील तेजीचे हे कारण आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vijay Jawandhiya said Economics behind the boom in agriculture

टॉपिकस