esakal | ...अन् विनयचे नवीन बूट घालण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले; दुसऱ्या दिवशी मृतदेहच आढळला
sakal

बोलून बातमी शोधा

Vinays body was found the next day

साहित्य खरेदी केल्यानंतर बाजूलाच कन्हान नदीत पोहण्याचा मोह न आवरल्याने तिघेही नदी पात्रात अंघोळीसाठी उतरले. खोल पाण्याचा अंदाज नसल्याने तिघेही बुडाले. आरडाओरड केल्याने बाजूलाच क्रिकेट खेळणारी मुले धावत आली.

...अन् विनयचे नवीन बूट घालण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले; दुसऱ्या दिवशी मृतदेहच आढळला

sakal_logo
By
सुनील सरोदे

कन्हान (जि. नागपूर) : नागपूर येथील तीन अल्पवयीन मुले शुक्रवारी (३० ऑक्टोबर) दुपारी दोन ते तीन वाजताच्या सुमारास पिवळी नदी, कन्हान येथील रेल्वे क्रॉसिंगजवळील फुटपाथवर स्वस्त बूट मिळतात म्हणून विकत घेण्यासाठी दुचाकीने गेले होते. बूट खरेदी केल्यानंतर जवळच असलेल्या नदीवर पोहण्यासाठी गेले. पोहता पोहता वाहून गेलेला विनय कुशवाह याचा मृतदेह दुसऱ्या दिवशी ढिवर समाज सेवा संघटनेच्या कार्यकर्त्यानी शोधून पाण्याबाहेर काढला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी आयूष आशीष मेश्राम (१५ वर्षे), तेजस राजेश दहिवले (१६ वर्षे) व विनय कुशवाह हे तिघे कन्हान रेल्वे क्रॉसिंगवर चपल, बूट स्वस्त मिळतात म्हणून दुचाकीने गेले. साहित्य खरेदी केल्यानंतर बाजूलाच कन्हान नदीत पोहण्याचा मोह न आवरल्याने तिघेही नदी पात्रात अंघोळीसाठी उतरले. खोल पाण्याचा अंदाज नसल्याने तिघेही बुडाले. आरडाओरड केल्याने बाजूलाच क्रिकेट खेळणारी मुले धावत आली.

जाणून घ्या - शेतकऱ्याला अखेर मिळाले पिकविम्याचे पैसे; रक्कम वाचून बसेल धक्का

करण गिवेले (१७, रा. सत्रापूर, कन्हान) याला पोहता येत असल्याने स्वःताच्या जिवाची पर्वा न करता नदीत उडी घेतली आणि आयुष आशीष मेश्राम व तेजस राजेश दहिवले यांना वाचविले. परंतु, विनय मधुराप्रसाद कुशवाह खोल पाण्यात बुडल्याने तो मिळाला नाही. सर्वांनी कन्हान पोलिस ठाण्याकडे धाव घेऊन घटनेची माहिती दिली.

लगेच पोलिसही घटनास्थळी पोहोचले. रात्र झाल्याने दुसऱ्या दिवसी ढिवर समाज सेवा संघटनेचे अध्यक्ष सुतेश मारबते, रामचंद्र भोयर, सुधाकर सहारे, हेमराज मेश्राम, धनराज बावने, संजय मेश्राम, विजय गोंडाळे, राजू मारबते यांच्या मदतीने विनय कुशवाहचा मृतदेह पाण्याबाहेर काढला.

ठिकठिकाणी विवर

यावर्षी आलेल्या पुरामुळे नदीमध्ये वाळूचे प्रमाण भरपूर वाढून ठिकठिकाणी विवर तयार झालेले आहेत. त्याचा अंदाज तिघांना न आल्याने पाण्यात उतरताच बुडायला लागले. त्याचा कुणालाही अंदाज बांधता येत नाही. परिसरातील लोकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नदीवर पोहायला जाणे किंवा मिरवणुकींमध्येही नदी, नाल्याच्या पाण्याशी नाद करू नये, असे आवाहन पोलिस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांनी केले.

हेही वाचा - 'जय-विरू'चं अनोख प्रेम! एक बैल हातपंपावर पाणी हापसतो, तर दुसरा पितो

गोसेखुर्दच्या पाण्याने घेतला महेशचा बळी

कुही तालुक्यातील नवेगाव चिचघाट (पु) येथे बुधवारी महेश साठवणे (वय २८) हा युवक शेतामध्ये बैल सोडण्यासाठी गोसेखुर्द धरणाच्या अडविलेल्या पाण्यामधून जात होता. पाय घसरल्याने तो खोल पाण्यात बुडाला. स्थानिक पातळीवर नाविकांद्वारे शोध घेऊनही युवकाचा शोध न लागल्याने २० अंमलदारांना युवकाचा शोध घेण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. तब्बल तीन दिवसांनंतर त्याचा मृतदेह शोधण्यात त्यांना यश आले.

संपादन - नीलेश डाखोरे