संस्कार भारतीचे माजी महामंत्री आणि व्हीएनआयटीच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष विश्राम जामदार यांचे निधन 

सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 14 October 2020

विश्राम जामदार हे कुशल संघटक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावंत स्वयंसेवक, कलेसाठी समर्पित व्यक्तिमत्त्व होते,  त्यांनी नागपूरमधील संस्कार भारती, विदर्भ अध्यक्ष, पश्चिम विभाग कार्यक्षमतेने 1985 मध्ये काम सुरू केले.

नागपूर : संस्कार भारतीचे माजी महामंत्री आणि विशेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष  श्री. विश्राम जी. जामदार, वय 73, यांचे दीर्घ आजाराने आज पहाटे 5.30 वाजता निधन झाले.

विश्राम जामदार हे कुशल संघटक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावंत स्वयंसेवक, कलेसाठी समर्पित व्यक्तिमत्त्व होते,  त्यांनी नागपूरमधील संस्कार भारती, विदर्भ अध्यक्ष, पश्चिम विभाग कार्यक्षमतेने 1985 मध्ये काम सुरू केले.  तसेच ते प्रख्यात उद्योजक होते, लघु उद्योग भारतीचे उपाध्यक्ष, धरमपेठ शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष आणि व्हीएनआयटीचे चेरमन देखील होते. 

परतीचा पाऊस आभाळातून नव्हे, ढसा ढसा डोळ्यातून बरसला

कोण होते विश्राम जामदार  

श्री. विश्राम जामदार यांना तीन वर्ष लघू उद्योग भारतीचे  माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि पीएमओ कार्यालयात कार्यरत कामगार संघटनेचे सदस्य म्हणून काम केले  आहे. व्हीएनआयटीचे अध्यक्ष, संचालक मंडळाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी संस्कार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री म्हणून काम केले. त्यांचे योगदान लक्षात घेऊन  तांत्रिक उत्कृष्टता मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या उद्योग गौरव पुरस्काराद्वारे त्यांना सन्मानित करण्यात आले. संरक्षण मंत्रालयाच्या आयात पर्याय पुरस्कार तर एमएसएफसीने महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट उद्योजक म्हणून त्यांना सन्मानित केले. 

एकाच वेळी निघाली दोघींची अंत्ययात्रा; एकीच्या नशिबी शेवटचे सोपस्कारही नाही

'व्हीएनआयटी'च्या वाटचालीत महत्वाचे योगदान  

विशेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या व्यवस्थापन मंडळाचे ते अध्यक्ष होते. व्हीएनआयटीच्या मागील काही वर्षांतील वाटचालीत त्यांचा महत्वाचा वाटा होता.  लघु उदयोग भारती या संघटनेचे पदाधिकारी तसेच  विविध शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांशीही त्यांचा जवळचा आणि सक्रिय संबंध होता.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: VNIT Chairman Vishram Jamdar is no more