sakal

बोलून बातमी शोधा

शहरात रोज जवळपास पाच ते सहा हजारांवर कोरोना बाधित रुग्णांची नोंद होत आहे. वाढत्या संक्रमणावर नियंत्रण मिळवण्यासाठी विक एण्ड लॉकडाउन लावण्यात आले आहे. 

शहरात रोज जवळपास पाच ते सहा हजारांवर कोरोना बाधित रुग्णांची नोंद होत आहे. वाढत्या संक्रमणावर नियंत्रण मिळवण्यासाठी विक एण्ड लॉकडाउन लावण्यात आले आहे. 

Weekend Lockdown Nagpur: ६६ ठिकाणी असणार नाकाबंदी; जाणून घ्या काय सुरू आणि काय बंद 

sakal_logo
By
राजेश प्रायकर

नागपूर : शहरातील वाढता कोरोना लक्षात घेता प्रशासनाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला असून आज शुक्रवार रात्रीपासून ते सोमवारी सकाळपर्यंत कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. बंदोबस्तासाठी २५०० पोलिस रस्त्यावर तैनात केले आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी ‘सकाळ‘शी बोलताना दिली.

कोरोनाची महात्सुनामी! नागपुरात दर दोन तासाला ५ जणांचा मृत्यू; आज नवे साडे ६ हजार रुग्ण 

शहरात रोज जवळपास पाच ते सहा हजारांवर कोरोना बाधित रुग्णांची नोंद होत आहे. वाढत्या संक्रमणावर नियंत्रण मिळवण्यासाठी विक एण्ड लॉकडाउन लावण्यात आले आहे. 

या काळात औषधी, प्रयोगशाळा, रुग्णालय, पोलिस, पत्रकार आणि इतर अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ये-जा करण्यासाठी ओळखपत्र सोबत बाळगावे लागेल. या काळात अत्यावश्यक सेवा, परीक्षा, विमानप्रवास, बस प्रवास, लसीकरणासाठी जाता येईल. किराणा दुकान, भाजीपाला, डेअरी वगळून सर्व प्रकारच्या आस्थापना बंद राहतील.

कोरोनामुळे प्रवासीही धास्तावले; मुंबई- पुण्याकडे रिकाम्याच धावताहेत ट्रेन; अनेक ट्रेन...

शहरात ६६ ठिकाणी नाकाबंदी असेल. शहर पोलिस आयुक्तांलयांतर्गत प्रवेश करणाऱ्या आठ सीमांचा त्यात समावेश असेल. या काळात ९९ वाहने पोलिस ठाण्यांतर्गत आणि २० वाहने परिमंडळ स्तरावर गस्तीवर असतील. राज्य राखीव पोलिस दलाच्या दोन कंपन्या, दंगल विरोधी पथकाच्या दोन तुकड्या आणि ५०० गृहरक्षकांचा समावेश असेल. लोकांना अन्नधान्य, भाजी, दूध घेण्यासाठी लांब अंतरावरील दुकानावर जाता येणार नाही. त्यांनी आपापल्या वस्तीतील दुकानातूनच ते विकत घ्यावे, असेही पोलिस आयुक्तांनी सांगितले.

संपादन - अथर्व महांकाळ 

go to top