काय घडले रेल्वे रूळावर, रूहीचा मृतदेह कसा काय? 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

बुधवारी संध्याकाळी 17 ते 20 वयोगटातील रूही सतीश बेलेकर या युवतीचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. 

टेकाडी (जि.नागपूर) : टेकाडी शिवारातील रामटेक रेल्वे रुळावर बुधवारी (ता. 15) संध्याकाळी एका युवतीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. युवतीचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन उपजिल्हा रुग्णालय कामठी येथे पाठविला. युवतीची ओळख उशीरा पटली असून तिचे नाव रूही सतीश बेलेकर (शंकरनगर, कांद्री कन्हान) असे आहे. ती रामटेक रेल्वे रुळावरून जात असताना नागपूर इतवारी रेल्वेला धडकल्याने तिचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी सोशल मीडियावर शेअर केली. 

क्‍लिक करा : video: पोटाची भूक भागवण्यासाठी "तो' घेतो हातात चाकू 
 
हत्या की अपघात? 

टेकाडीनजीक असलेल्या "ओव्हर ब्रिज'खाली अनेक प्रकारच्या असामाजिक तत्त्वांचा वावर असतो. तिथे जुगार खेळणे, मद्यपान करणे, दुचाकींचे स्टंट, गांजा, सिगारेटसोबत अनेक अनैतिक संबध असलेले वयस्क ते युवक युवतींचा मुक्‍तसंचार असतो. मात्र बुधवारी संध्याकाळी 17 ते 20 वयोगटातील रूही सतीश बेलेकर या युवतीचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. 

क्‍लिक करा : अबब ! तब्बल एक लाख 15 हजारांचा आकडा 

रेल्वे रूळावर कशी काय गेली? 
रूही ही नवव्या वर्गात बळीराम दखणे विद्यालयाची विद्यार्थिनी होती. तिचे वडिल नागपूरला राहतात. घटनेच्या दिवशी ती मैत्रिणीकडे पुस्तके आणण्यास जात असल्याचे तिच्या लहान भावाला सांगून घरून गेली होती. दुपारी तीन वाजताच्या सुमारास रामटेक रुळावरून जात असताना नागपूर इतवारी रेल्वेच्या धडकेत तिचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ट्रॅकमनकडून या घटनेची माहिती कन्हान पोलिसांना देण्यात आली. पोलिस निरीक्षक चंद्रकांत काळे हे पोलिस बलासह घटनास्थळी दाखल झाले. युवतीचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. युवतीच्या नातेवाइकांचा शोध घेणे सुरू केले आहे. युवती ही एकटी रेल्वेरुळावर कशी काय पोचली, तिचा अपघात कसा झाला, अशा चर्चांना ऊत आला आहे. सध्या तरी ही घटना अपघात आहे की हत्या, याचा पेच उकलला नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What happened on the train, what was the body of Ruhi?