तुम्हीच सांगा नेमके कोणाच्या आदेशाचे पालन करावे; का विचारत आहे शिक्षक हा सवाल?

नीलेश डोये
Friday, 4 September 2020

गटशिक्षणाधिकारी रामटेक यांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या ११ सप्टेंबर २०२० पत्राचा संदर्भ दिलेला आहे. ११ सप्टेंबर २०२० ही तारीख यायचीच असून, ते चुकीचे असल्याचे निदर्शनास येत असल्याचे केंद्र प्रमुखांचे म्हणणे आहे.

नागपूर : शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहे. काही तालुक्यांमध्ये तहसीलदारांनी शिक्षकांना कोरोनाचे काम करण्यास सांगितले आहे. एवढेच नव्हे तर गट विकास अधिकाऱ्यांनी आठवड्यातून तीन दिवस पंचायत समितीच्या कार्यालयात बसण्यास सांगितले आहे. त्यामुळे नेमके कोणाचे ऐकायचे आणि कुठले काम करायचे असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.

रामटेक येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांनी २ सप्टेंबर २०२० ला शिक्षकांनी पूर्ण वेळ शाळेत उपस्थित राहून शैक्षणिक कार्य करण्याचे पत्र काढले. तर १० ऑगस्टला केंद्रप्रमुखांनी शाळा भेटी करून सुरू असलेल्या शैक्षणिक कार्याचा अहवाल सादर करण्याचे पत्र दिले होते. कोरोनाचा वाढता उद्रेक लक्षात घेता शाळा सुरू ठेवणे याबाबत शासन स्तरावरून कुठलेही पत्र नाही.

वाचा - नागरिकांनो सावधान! हा जीव तुमच्या घरी तर नाही ना? असेल तर आताच काढा बाहेर.. अन्यथा..

गटशिक्षणाधिकारी रामटेक यांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या ११ सप्टेंबर २०२० पत्राचा संदर्भ दिलेला आहे. ११ सप्टेंबर २०२० ही तारीख यायचीच असून, ते चुकीचे असल्याचे निदर्शनास येत असल्याचे केंद्र प्रमुखांचे म्हणणे आहे.

याशिवाय शाळा बंद असल्यामुळे शिक्षकांनी शाळेत पूर्ण वेळ उपस्थित राहून शैक्षणिक कार्य कसे करावे? केंद्रप्रमुखांनी शाळा भेटी कश्या कराव्या? नेमके कोणाच्या आदेशाचे पालन करावे, याबाबत शिक्षक व केंद्रप्रमुख यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.

अवश्य वाचा - हे तर जणू तुकाराम मुंढेच! नागपूरच्या नव्या आयुक्तांचा तब्बल ६६ अधिकाऱ्यांना दणका..

संभ्रम दूर करा

शिक्षकांना स्पष्टपणे निर्देश देऊन त्यांच्यातील संभ्रम दूर करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्र प्रमुख सभेचे भूपेश चव्हाण, प्रमोद लोणारे, टेमराज माले, महेंद्र पारसे, रामकृष्ण ढोके, संध्या झिले आदींनी सीईओ योगेश कुंभेजकर यांना दिलेल्या निवेदनात केली.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What teachers want to do