उद्यापासून शाळा अन् विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा पत्ता नाही; पहिल्याच दिवशी आश्वासनाचा फज्जा!

नीलेश डोये
Tuesday, 26 January 2021

समग्र शिक्षा अभियानांतर्गत गणवेश खरेदीच निधी महिन्याभर पूर्वीच शाळा स्तरावर वळता करण्यात आला. परंतु अद्याप त्याची खरेदीच झालीच नाही. त्यामुळे विद्यार्थी पहिल्या दिवशी जुन्याच गणवेशात येतील.

नागपूर : २७ जानेवारी २०२१ पासून ५ ते ८ वी वर्गाच्या ग्रामीण भागातील शाळा सुरू होणार आहे. शाळा सुरू होण्यास एकच दिवस शिल्लक असताना अद्याप गणवेश खरेदीची प्रक्रियाच पूर्ण न झाल्याने पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थी गणवेश येण्याचा दावा जिल्हा परिषद प्रशासन व सत्ताधाऱ्यांचा दावा फोल ठरणार आहे. 

ग्रामीण भागामध्ये इयत्ता ५ ते ८ च्या १७८८ वर शाळा असून, १ लाख ५० हजारावर विद्यार्थी पटसंख्या आहे. तर १० हजार ६२७ शिक्षक आहेत. गणवेश खरेदीचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीकडे आहे. सर्व शाळा वेगवेगळा रंग निश्चित करतात. रंगात एकसूत्रीपणा आणण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने ग्रे रंगाचा पॅंट व पिंक रंगाचा शर्टचा असा गणवेश निश्चित केला आहे.

जाणून घ्या - स्वयंपाक करताना महिलेला अचानक आली दुर्गंधी अन् क्षणात उध्वस्त झाला सुखी संसार; परिसरात हळहळ

समग्र शिक्षा अभियानांतर्गत गणवेश खरेदीच निधी महिन्याभर पूर्वीच शाळा स्तरावर वळता करण्यात आला. परंतु अद्याप त्याची खरेदीच झालीच नाही. त्यामुळे विद्यार्थी पहिल्या दिवशी जुन्याच गणवेशात येतील. ओबीसी व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थांच्या गणवेशाचा निधी अद्याप वळताच करण्यात आला नाही. त्यामुळे शाळेत रंगीबेरंगी गणवेशात विद्यार्थी दिसतील, अशी टीका होत आहे. 

एकच गणवेश

समग्र शिक्षण अभियानांतर्गत दोन गणवेश देण्यात येते. ३०० रुपये प्रति गणवेशप्रमाणे एका विद्यार्थ्याकरता ६०० रुपये देण्यात येते. यंदा एकाच गणवेशाचा म्हणजे ३०० रुपये केंद्राकडून देण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थांना संपूर्ण आठवडाभर एकच गणवेश घालून यावा लागणार असल्याचे दिसते.

जाणून घ्या - फ्लॅट लिलावाची नोटीस येताच अभियंत्यानं उचललं धक्कादायक पाऊल, कुटुंबीयांना बसला धक्का

गणवेश खरेदीसाठी पुरवठादारांची सक्ती

पदाधिकाऱ्यांची नावे सांगून काही पुरवठादार गणवेश खरेदीसाठी दबाव टाकत असल्याची बाब शिक्षक संघटनेने सीईओंच्या लक्षात आणून दिला आहे. तर संपूर्ण जिल्ह्यात तीन कंत्राटदारांना गणवेशाच कंत्राट दिल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते अनिल निदान व राजेंद्र हरडे यांनी केला. तीनही पुरवठादारांचा दर ३०० रुपये असल्याचा खुलासा त्यांनी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When students will get uniforms in Nagpur district