प्राध्यापक भरती अडकली कुठे? महाराष्ट्र अंशकालीन प्राध्यापक संघटनेचा सवाल

मंगेश गोमासे 
Sunday, 15 November 2020

दरवर्षी महाविद्यालयांमध्ये अंशकालीन प्राध्यापकांची नेमणूक केल्या जाते. १९९१ साली प्राध्यापकांच्या रिक्त पदावर विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी तात्पूरती सोय व्हावी हाच त्यामागे हेतू होता. मात्र, या रिक्त जागेवर वर्षानुवर्षे पदभरती करण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे

नागपूर ः महाविकास आघाडी सरकारमधील उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी १६ सप्टेंबर २०२० ला झालेल्या आभासी बैठकीत दोन महिन्यात प्राध्यापक भरती सुरू करणार असे सुतोवाच केले होते. मात्र, अद्याप प्राध्यापक भरतीचे कुठलेही निर्देश सरकारने दिले नसल्याने प्राध्यापक भरती अडली असून मंत्र्यांची घोषणा आभासी ठरणार काय? असा प्रश्न महाराष्ट्र अंशकालीन प्राध्यापक संघटनेने उपस्थित केला आहे.

दरवर्षी महाविद्यालयांमध्ये अंशकालीन प्राध्यापकांची नेमणूक केल्या जाते. १९९१ साली प्राध्यापकांच्या रिक्त पदावर विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी तात्पूरती सोय व्हावी हाच त्यामागे हेतू होता. मात्र, या रिक्त जागेवर वर्षानुवर्षे पदभरती करण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे

हेही वाचा - आता दुपारच्या वेळी बिनधास्त झोपा; 'हे' आहेत दुपारी झोपण्याचे फायदे

याचाच फायदा घेऊन अंशकालीन प्राध्यापकांना तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागते. राज्यात १५ हजारापेक्षा जास्त जागा आहेत. त्यासाठी ५० हजारापेक्षा जास्त पात्रताधारक आहेत. मागील सरकारने प्राध्यापक भरती करण्याचा निर्णय घेतला. मात्र, केवळ ‘तारीख पे तारीख' देत, त्यांनीही वेळ मारुन नेली. 

दरम्यान राज्यात सरकार बदलल्याने अंशकालीन प्राध्यापकांच्या डोळ्यात आस जागली होता. त्यात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी १६ सप्टेंबर २०२० ला झालेल्या आभासी बैठकीत दोन महिन्यात प्राध्यापक भरती करण्याचे आश्वासन दिले. मात्र, अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याने ही घोषणा आभासी ठरत आहे. 

सविस्तर वाचा - ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तिघा भावांचे मृतदेह बघून अख्खे गाव हळहळले; तलावात बुडून झाला मृत्यू

महाविकास आघाडी सरकार पदभरतीवरील बंदी उठवून राज्यातील हजारो नेट,सेट,पीएच.डी.धारक बेरोजगारांना न्याय देईल ही अपेक्षा व्यक्त करीत आहे. सध्या करोनामुळे पदभरती थांबली असल्याचे बोलल्या जात आहे. मात्र सरकारने याबाबत कुठलीही भूमिका न घेतल्यास संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा महाराष्ट्र अंशकालीन प्राध्यापक संघटनेचे शहराध्यक्ष प्रा. प्रमोद लेंडे यांनी दिला आहे.

संपादन- अथर्व महांकाळ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: where is jobs of professors asked maharashtra professor community