मंत्र्यांची घोषणा ठरणार आभासी; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे सूतोवाच गेले हवेत

Where stop professor recruitment
Where stop professor recruitment

नागपूर : महाविकास आघाडी सरकारमधील उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी १६ सप्टेंबर २०२० ला झालेल्या आभासी बैठकीत दोन महिन्यांत प्राध्यापक भरती सुरू करणार, असे सूतोवाच केले होते. मात्र, सरकारने अद्याप कुठलेही निर्देश दिले नसल्याने प्राध्यापक भरती अडली आहे. मंत्र्यांची घोषणा आभासी ठरणार काय, असा प्रश्न महाराष्ट्र अंशकालीन प्राध्यापक संघटनेने उपस्थित केला आहे.

दरवर्षी महाविद्यालयांमध्ये अंशकालीन प्राध्यापकांची नेमणूक केली जाते. १९९१ साली प्राध्यापकांच्या रिक्त पदावर विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी तात्पूरती सोय व्हावी हाच त्यामागे हेतू होता. मात्र, या रिक्त जागेवर वर्षानुवर्षे पदभरती करण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. मात्र, याचाच फायदा घेऊन अंशकालीन प्राध्यापकांना तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागते.

राज्यात १५ हजारांपेक्षा जास्त जागा आहेत. त्यासाठी ५० हजारांपेक्षा जास्त पात्रताधारक आहेत. मागील सरकारने प्राध्यापक भरती करण्याचा निर्णय घेतला. मात्र, केवळ ‘तारीख पे तारीख' देत त्यांनीही वेळ मारून नेली. दरम्यान, राज्यात सरकार बदलल्याने अंशकालीन प्राध्यापकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या.

त्यात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी १६ सप्टेंबर २०२० ला झालेल्या आभासी बैठकीत दोन महिन्यांत प्राध्यापक भरती करण्याचे आश्वासन दिले. मात्र, अद्याप कुठलीही कार्यवाही करण्यात आली नसल्याने ही घोषणा आभासी ठरत आहे.

संघटनेच्या माध्यमातून आंदोलन

महाविकास आघाडी सरकार पदभरतीवरील बंदी उठवून राज्यातील हजारो नेट, सेट, पीएच.डी.धारक बेरोजगारांना न्याय देईल, ही अपेक्षा व्यक्त करीत आहे. सध्या कोरोनामुळे पदभरती थांबली असल्याचे बोलले जात आहे. मात्र, सरकारने याबाबत कुठलीही भूमिका न घेतल्यास संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र अंशकालीन प्राध्यापक संघटनेचे शहराध्यक्ष प्रा. प्रमोद लेंडे यांनी दिला आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com