मौजमजा करताना तलावात झाला अंघोळीचा मोह, नंतर जिवावर बेतला

अजय धर्मपुरीवार
Friday, 9 October 2020

अंघोळ करता करता अचानक खोल पाण्यात गेल्यामुळे तलावातील गाळात बुडाला. इतर मित्रांनी दुपट्टे टाकून त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र कुणालाच पोहता येत नसल्यामुळे इंदरचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती हिंगणा पोलिसांना दुपारी दीड वाजताच्या सुमारास मिळाली.

हिंगणा (जि.नागपूर) : जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून आजपर्यंत मौजमजा करायली गेलेल्या किमान आठ युवकांचा तलावात बुडून मृत्यू झाला. कालपरवाच पेंच कालव्यात पोलिस भरतीसाठी तलावा धावण्याचा सराव करताना एका युवकाचा दुर्दैवी अंत झाल्याची शाई वाळते न वाळते तोच   उसंत मिळाली म्हणून  ‘लव्हर्स पॉइंट’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या मोहगाव (झिल्पी) धरणावर  फिरायला गेलेल्या सहा मित्रांपैकी एका युवकाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी (ता.८) उघडकीस आली.

हेही वाचाः सूरताल झाले बेताल, जादू झाली छूमंतर, कलेला लागली कोरोनाची नजर

अंघोळ करता करता बुडाला
७ ऑॅक्टोबर रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास इलेक्ट्रीक झोन परिसरातील सहा मित्र तीन दुचाकीवर फिरायला गेले.  तेथे अंघोळ करण्याचा मोह त्यांना आवरला नाही. सहा युवकांना पोहता येत नव्हते, तरीसुद्धा त्यांनी तलावात अंघोळ करण्याचा आग्रह धरला. आंघोळ करत असताना इंदर मोहन जगदीप कश्यप (वय३१, इलेक्ट्रिक झोन, कार्तिक नगर) येथील रहिवासी आहे. इंदर हा अंघोळ करता करता अचानक खोल पाण्यात गेल्यामुळे तलावातील गाळात बुडाला. इतर मित्रांनी दुपट्टे टाकून त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र कुणालाच पोहता येत नसल्यामुळे इंदरचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती हिंगणा पोलिसांना दुपारी दीड वाजताच्या सुमारास मिळाली. माहिती मिळताच ठाणेदार सारीन दुर्गे यांच्यासह पथक पोहोचले. मृत युवकाचा शोध घेण्यात आला.

अधिक वाचाः आमदानी अठ्ठनी, खर्चा रुपया, त्याचेच नाव सोयाबीन

पावसामुळे शोधकार्यात अडचणी
मात्र मृतदेह खोल पाण्यात असल्यामुळे त्यांना अग्निशामक विभागाला पाचारण करून मृतदेहाचा शोध घेण्यात आला. परंतू पाच वाजताच्या सुमारास  मुसळधार पावसामुळे शोधकार्यात अडचणी निर्माण झाल्या व शेवटी अंधार झाल्यामुळे अग्निशमन विभागाला तसेच परत जावे लागले. गुरुवारी  सकाळी सात वाजताच्या सुमारास मृतदेह पाण्याबाहेर आला‌. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आला‌. पंचनामा करून पुढील तपास सुरू केला. घटनेचा पुढील तपास ठाणेदार सांरिन दुर्गे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक अमृता सोमवंशी व पोलिस कर्मचारी विशाल तोडासे, आशीष पौनीकर करीत आहेत.

संपादनःविजयकुमार राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: While having fun, he was tempted to take a bath in the pool, then he lost his life