कोण म्हणाले, गैरहजर राहिल्यास कापू वेतन...वाचा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जून 2020

मर्यादित कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सरकारी कामकाजही सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून आठवड्यातून किमान एक दिवस कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार उच्च शिक्षण नागपूर विभागाचे सहसंचालक डॉ. महेशकुमार साळुंखे यांनी नागपूर विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांना पत्र पाठवले आहे.

नागपूर  : राज्यातील टाळेबंदी हटवत मुख्यमंत्र्यांनी शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने 15 टक्के उपस्थितीसह महाविद्यालये सुरू करण्याचे पत्र महाविद्यालयांना पाठविले. यामुळे बऱ्याच महाविद्यालयांतील कर्मचारी दिवसाआड येत आहेत. मात्र, कोरोना व टाळेबंदीचा गैरफायदा घेत काही कर्मचारी कार्यालयात भटकतच नसल्याचे लक्षात आले आहे. यामुळे उच्च शिक्षण सहसंचालकांनी नियमाचा भंग करणाऱ्यांना वेतन मिळणार नसल्याचे पत्रच पाठविले आहे.

मर्यादित कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सरकारी कामकाजही सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून आठवड्यातून किमान एक दिवस कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार उच्च शिक्षण नागपूर विभागाचे सहसंचालक डॉ. महेशकुमार साळुंखे यांनी नागपूर विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांना पत्र पाठवले आहे.

हेही वाचा : आम्हाला नाही का ऑनलाईन शिक्षणाचा अधिकार, कुठलीही सुविधा नाही उपलब्ध

यानुसार एखादा सरकारी कर्मचारी ठरलेल्या दिवशी कामावर न आल्यास त्याची आठवड्याची गैरहजेरी लावण्यात येणार असून ती विनावेतन रजा समजली जाणार आहे. त्यामुळे या दिवसांचा पगार कर्मचाऱ्यांना मिळणार नाही. सरकारी कर्मचाऱ्यांनी शासकीय कामाप्रति निष्ठा ठेवणे अनिवार्य असून कार्यालयातील कामाचे कर्मचारीनिहाय समन्यायी वाटप होणे आवश्‍यक आहे, असे निर्देश देण्यात आले आहेत. जे कर्मचारी आठवड्यातून एक दिवस हजर राहणार नाही त्यांचे त्या संपूर्ण आठवड्याचे वेतन कपात करण्यात येईल, असे निर्देशही देण्यात आले आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who said, cut the salary if you are absent ... read on