कोण करतोय सरसंघचालक मोहन भागवत यांची बदनामी करण्याचा प्रयत्न?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 जानेवारी 2020

अनुसूचित जाती-जमाती, मागास प्रवर्गांवर अन्याय करण्यासाठी नवे संविधान वापरले जाईल, अशा आशयाचे संदेशही या पुस्तिकेच्या असून हा प्रकार करणाऱ्याविरूद्ध कडक कारवाई करावी अशी मागणी संघाने केली आहे.

नागपूर : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या नावाने व्हायरल झालेल्या पुस्तकातून संघाची बदनामी करणाऱ्याला पकडा, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केली. शुक्रवारी महानगर कार्यवाह अरविंद कुकडे यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात प्रकरणाची तक्रार दिली. "नया भारतीय संविधान' या नावाने हिंदी भाषेतील हे पुस्तक झपाट्याने व्हायरल होत आहे. या पुस्तकाशी संघाचा कुठलीही संबंध नसल्याचे

महानगर सहसंघचालक श्रीधर गाडगे यांनी पत्रपरिषदेत स्पष्ट केले. हा मानहानीकारक व धमकाविणारा मजकूर पूर्णत: खोटा आहे. ही फाईल सामान्य नागरिकांमध्ये गेल्यास त्याचे वाईट परिणाम होतील. समाजात अस्थिरता निर्माण करू इच्छिणाऱ्याचाच हा प्रताप असून, संघाने असे कोणतेही "नया भारतीय संविधान' सुचवले नसल्याचे श्रीधर गाडगे म्हणाले. या पुस्तकात डॉ. मोहन भागवत यांनी ती लिहिल्याचे खोटे नमूद केले असून, सध्याचे भारतीय संविधान बदलून केवळ उच्चवर्णीयांना सर्व क्षेत्रात प्राधान्य देणारे नवे संविधान लागू करण्याची योजना असल्याची माहिती यात नमूद आहे.

अनुसूचित जाती-जमाती, मागास प्रवर्गांवर अन्याय करण्यासाठी नवे संविधान वापरले जाईल, अशा आशयाचे संदेशही या पुस्तिकेच्या असून हा प्रकार करणाऱ्याविरूद्ध कडक कारवाई करावी अशी मागणी संघाने केली आहे.

- साहेबरावने झटकला पंजा अन फसला देशातील पहिला प्रयोग... वाचा

सदर पुस्तक कुणी छापले, त्या प्रकाशन-प्रकाशकाचे नाव, पत्ता, आवृत्ती वा अन्य कुठलीही माहिती कोणत्याही पानावर दिलेली नाही. मात्र, कायदेशीररीत्या कोणतेही पुस्तक छापले जात असेल तर त्यात प्रकाशन-प्रकाशकाचे नाव, आयएसबीएन वा नोंदणीक्रमांक असणे गरजेचे असते. या पुस्तिकेवर मात्र तशी कोणतीही माहिती नसल्याने केवळ बुद्धीभेद करण्यासाठी व विशिष्ट समाजाला भडकवण्यासाठीच ही पुस्तिका प्रसारित करण्यात येत असल्याचे याप्रसंगी श्रीधर गाडगे म्हणाले. या पत्रपरिषदेला विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे, प्रांत सहकार्यवाह अतुल मोघे, महानगर संघचालक राजेश लोया, महानगर सहकार्यवाह रविंद्र बोकारे व संघप्रचारक अजय तलताडे व पदाधिकारी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who is trying to defame RSS chief Mohan Bhagwat?