पतीच्या सततच्या जाचाला कंटाळून पत्नीची आत्महत्या

चंद्रकांत श्रीखंडे
Monday, 14 September 2020

मेघाने पैसे आणण्यास नकार दिल्यानंतर अमित मद्यप्राशन करून किरकोळ कारणातून भांडव न मारहाण करायचा़. या त्रासाला कंटाळून मेघाने जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी दुपारी २.३० वा़जताच्या सुमारास मेघाने विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

कळमेश्वर (जि. नागपूर) : पती-पत्नीमध्ये होणारे वाद काही नवीन नाही. लहान-सहान कारणावरून नेहमीच खटके उडत असतात. कधी चारित्रावर संशय घेऊन वाद होतो तर कधी पैशांसाठी पती-पत्नीमध्ये भांडण होत असतात. कधी माहेरून पैसे आणण्यासाठी मारहाण केली जाते. त्यामुळे प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचते. कधी-कधी हा वाद इतका विकोपाला जातो की कुणी एक आत्महत्या करेपर्यंत पोहोचतो. असाच एक वाद नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यात घडला आणि पुढील घटनाक्रम घडला...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेघा अमित धांडे (वय २३, रा. घोराड, ता. कळमेश्वर) व अमित धांडे यांचे दोन वर्षांआधी लग्न झाले होते. दोघांच्या सुखी संसाराला सुरुवात झाली. लग्नानंतर वर्षभर अमित मेघासोबत चांगला वागला़. मात्र, त्यानंतर अमित मेघाला पैशासाठी त्रास देऊ लागला. ‘तुझा बाप खूप श्रीमंत आहे, ते तुला मागितले तेवढे पैसे देऊ शकतात, तू वडिलांकडून पैसे घेऊन ये’ असे बोलून वारंवार माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावत होता.

जाणून घ्या - प्रसूती शस्त्रक्रियेनंतरही मातेला होत होत्या असह्य वेदना; रुग्णालयात भरती करताच पोटात आढळले..

मेघाने पैसे आणण्यास नकार दिल्यानंतर अमित मद्यप्राशन करून किरकोळ कारणातून भांडव न मारहाण करायचा़. या त्रासाला कंटाळून मेघाने जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी दुपारी २.३० वा़जताच्या सुमारास मेघाने विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

तिला उपचारार्थ नागपूर येथील मेयो हॉस्पिटलमध्ये भरती केले असता मृत्यू झाला़. याप्रकरणी निलीन कृष्णाजी भडंग यांच्या तक्रारीवरून कळमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक खडसे करीत आहे़.

क्लिक करा - "नागपूरच्या नावाने कानाला खडा"! माजी आयुक्त तुकाराम मुंढे म्हणतात पुन्हा कधी येणार नाही; वाचा त्यांची खास मुलाखत

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा

लग्नाच्या दोन वर्षांतच पती माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा लावू लागला. नकार दिल्यास मारहाण करायचा. पैशांसाठी शारीरिक व माहसिक त्रास देत होता. पतीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पत्नीने विष घेऊन आत्महत्या केली़. याप्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल केला़ आहे. ही घटना स्थानिक पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या घोराड येथे घडली़.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wife commits suicide due to constant harassment of husband