esakal | पत्नीनेच साथीदाराच्या मदतीने केला पतीचा खून, दोन आरोपी ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

wife murder husband in kelwad of nagpur

जयदीप हा पत्नी कविताला मारझोड करायचा. तसेच मानसिक त्रास देत होता. त्यामुळे तिने कंटाळून पतीला कायमचे संपवायचे ठरवले. या उद्देशाने सावनेरमधील खेडकर लेआऊट येथील चंदन नथ्थू दियेवार (वय २८)या तरुणाला हाताशी घेत पती जयदीपला संपवायचा कट रचला

पत्नीनेच साथीदाराच्या मदतीने केला पतीचा खून, दोन आरोपी ताब्यात

sakal_logo
By
अशोक डहाके

केळवद (जि. नागपूर): केळवद पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या नरसाळा-खापा शिवारात अज्ञात व्यक्तीचा मृतदहे आढळून आला. त्याची ओळख पटवली असता तो जयदीप लोखंडे (वय ३९, रा. सावनेर)चा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले असून त्याच्या पत्नीनेच त्याची हत्या केल्याचा तपासात समोर आले आहे.

हेही वाचा - शाळा अद्यापही बंद, विद्यार्थिनी मुकणार उपस्थिती...

जयदीप हा पत्नी कविताला मारझोड करायचा. तसेच मानसिक त्रास देत होता. त्यामुळे तिने कंटाळून पतीला कायमचे संपवायचे ठरवले. या उद्देशाने सावनेरमधील खेडकर लेआऊट येथील चंदन नथ्थू दियेवार (वय २८)या तरुणाला हाताशी घेत पती जयदीपला संपवायचा कट रचला. त्यासाठी छिंदवाडा येथील रहिवासी सुनिल जयराम मालविय (वय २७)याला ५० हजार रपुये देऊन जयदीपचा खून करण्याचे ठरले. ९ ऑक्टोबरला आरोपी चंदनने सुनील याचा वाढदिवस असल्याचे जयदीपला सांगत नरसाळा परिसरातील पडीक शेतीवर पार्टी करण्यासाठी दूचाकीवरून नेले. त्याठिकाणी सुनील आधीच उपस्थित होता. दोन्ही आरोपींनी त्याच्या गळ्यावर चाकून वार करत त्याला ठार केले आणि घटनास्थळावरून पसार झाले. 

हेही वाचा - 'चार एकरात सोयाबीन पेरले, दुबार पेरणीही केली; पण परतीच्या पावसानं होत्याचं नव्हतं झालंय'

केळवद पोलिसांनी मृत जयदीप लोखंडेची पत्नी देवका उर्फ कविता जयदीप लोखंडे, चंदन दियेवार यांना अटक केली. तसेच याप्रकरणी गुन्हा दाखल करून तिसऱ्या फरार आरोपीचा शोध घेणे सुरू आहे. पुढील तपास ठाणेदार सुरेश मट्टामी यांच्या मार्गदर्शनाखाली केळवद पोलीस करत आहेत.