कोरोनासोबत आता "त्यांनी'ही केले माणसांनाच "टार्गेट', कोण आहेत ते...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 मे 2020

कोरोनासोबत आता "त्यांनी'ही केले माणसांनाच "टार्गेट', कोण आहेत ते...
जलालखेडा (जि.नागपूर) : शनिवारी भिवापूर तालुक्‍यातील बेसूर येथे शेतकरी व मजूरावर वाघींनीने हल्ल्या केल्याच्या घटनेत दोघे जण झाले. आज परत नरखेड तालुक्‍यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या दोन वेगवेगळया घटना घडल्या.

कोरोनासोबत आता "त्यांनी'ही केले माणसांनाच "टार्गेट', कोण आहेत ते...
जलालखेडा (जि.नागपूर) : शनिवारी भिवापूर तालुक्‍यातील बेसूर येथे शेतकरी व मजूरावर वाघींनीने हल्ल्या केल्याच्या घटनेत दोघे जण झाले. आज परत नरखेड तालुक्‍यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या दोन वेगवेगळया घटना घडल्या.

हेही वाचा: पानठेला सांभाळून चालवायची "ती'अख्खा संसाराचा गाडा, मग का उचलले तिने असे पाउल...

दोघे जखमी, घटना वाढल्या
नरखेड तालुक्‍यात गावांमध्ये एकीकडे कोरोनाची दशहत आहे, तर दुसरीकडे शेत, जंगलात वन्यप्राण्यांची दशहत आहे. तालुक्‍यात मागील काही दिवसांपासून वन्यप्राणी दिसण्याच्या व त्यांच्या शिकारीच्या घटना घडत आहेत. अशाच प्रकारच्या दोन घटना आज (ता. 24) पुन्हा उघडकीस आल्या. या दोन्ही घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या असून, यात दोन जण जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले आहे.

हेही वाचा : बापरे !चक्‍क पित्याने केला पेट्रोल टाकून मुलाला संपविण्याचा प्रयत्न, कारण होते...

वाघ नव्हे लांडगा तो !
नरखेड तालुक्‍यातील उमठा येथील शेरीत भोसले(वय 44) रविवारी सकाळी त्यांच्या जंगलात बांधलेल्या बकऱ्या पाहण्यासाठी जंगलात गेले. त्यांना एक वन्यप्राणी पाणी पिताना दिसला. त्यांना तो वाघ वाटला व त्याला हुसकविण्यासाठी आवाज काढला, तर त्या प्राण्याने भोसले यांच्यावरच हल्ला करून जखमी केले. त्यानंतर तो प्राणी निघून गेला. दुसऱ्या घटनेत लोहारीसावंगा येथील गंगाधर सुरजुसे (वय 55) हे बकऱ्या चारण्यासाठी खराशी जंगलात गेले होते. येथेही त्यांच्यावर एका वन्यप्राण्याने हल्ला चढविला व त्यांना जखमी केले. हात दोन्ही घटना काही वेळातच दोन वेगवेगळ्या जंगलात घडल्या असून हल्ले करणारे वन्यप्राणी वेगवेगळे असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दोन्ही जखमींना त्यांच्यावर वाघाने हल्ला केल्याचे सांगितले; पण हल्ल्याचा प्रकार पाहून ते वन्यप्राणी वाघ नसून तडस असल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.

हेही वाचा : तो निघाला कोरोना सर्वेक्षणाला आणि दारातच गाठले मृत्यूने !उन्हाचा तडाखा, कामाचा ताण की...

जखमींवर उपचार सुरू
घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन जखमींना जलालखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. येथे जखमींवर वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत वेखंडे यांनी प्राथमिक औषधोपचार करून त्यांना पुढील उपचारांसाठी नागपूरला रवाना केले. वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जखमींना आर्थिक सहकार्य करून त्यांना नागपूरला रवाना केले. जखमींना नागपूरला हलविल्यानंतर वनविभागाची एक चमू वन्यप्राण्यांचा शोध घेण्यासाठी दोन्ही जंगलात दाखल झाली आहे. या घटनेनंतर पुन्हा तालुक्‍यातील काही जंगलात हिंस्र वन्यप्राणी असल्याच्या घटनेला दुजोरा मिळाला आहे.

प्राण्यांचा शोध घेण्यासाठी दोन चमू जंगलात
घटनेत वन्यप्राण्यांनी हल्ला करून दोघांना जखमी केले. त्यांना नागपूरला हलविण्यात आले आहे. जखमी हे हल्लेखोर प्राणी वाघ असल्याचे सांगत असले तरी मात्र हल्ला करण्याची पद्धत व प्रकार पाहून ते वाघ नसून तडस असल्याचा अंदाज आहे. या प्राण्यांचा शोध घेण्यासाठी दोन चमू तयार करण्यात आल्या आहे व त्यांना दोन्ही जंगलात पाठविण्यात आले आहे.

-शेषराव टुले
नरखेड वनपरिक्षेत्राचे अधिकारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wildlife attack in Narkhed taluka, Two injured