esakal | महिला उद्योजिकांची संख्या दोन कोटींपर्यंत नेणार : नितीन गडकरी 
sakal

बोलून बातमी शोधा

will raise woman industrialist number to crore said nitin gadkari

स्त्री उद्यमी फाऊंडेशनच्यावतीने महिला उद्योजिका मेळाव्यात गडकरी महिला उद्योजिकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधताना म्हणाले, की देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) आज कमी आहे.

महिला उद्योजिकांची संख्या दोन कोटींपर्यंत नेणार : नितीन गडकरी 

sakal_logo
By
राजेश चरपे

नागपूर ः देशात सध्या उद्योगांमध्ये यशस्वी महिला उद्योजिकांची संख्या ८० लाख असून येत्या पाच वर्षात महिला उद्योजिकांची संख्या दोन कोटींपर्यंत नेण्याचे प्रयत्न आहे. त्यासाठी एमएसएमईच्या माध्यमातून मदत करण्यास तयार आहोत, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. 

हेही वाचा - अपहरणानंतर विवाहितेवर सामूहिक अत्याचार, फेसबुकवरून झाली होती ओळख 

स्त्री उद्यमी फाऊंडेशनच्यावतीने महिला उद्योजिका मेळाव्यात गडकरी महिला उद्योजिकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधताना म्हणाले, की देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) आज कमी आहे. ग्रामीण आणि मागास भागाचा औद्योगिक विकास झाला तर जीडीपी वाढेल. 

आज ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था फक्त ८० हजार कोटींची आहे. ती पाच लाख कोटींपर्यंत नेण्याची गरज असल्यामुळे महिला उद्योजिकांनी आता ग्रामीण भागात उद्योग सुरू करून त्या भागाचा विकास आणि सोबतच महिला सशक्तीकरण करणे गरजेचे आहे.

सविस्तर वाचा - सतत ॲसिडिटीचा त्रास होतो? आहारात करा पुढील बदल; फरक नक्की जाणवेल

 ग्रामीण भागात तेथील कच्चा मालावर आधारित उद्योग सुरू होऊ शकतात. आमच्याकडे विविध कला अवगत असलेले कलाकार आहेत, पण त्यांच्या कलेला वाव मिळत नाही. सूक्ष्म, मध्यम व लघू उद्योग विभागामार्फत शासन या कलाकारांच्या कलेला वाव आणि प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करीत आहोत,असे गडकरी यांनी सांगितले.

संपादन - अथर्व महांकाळ