ट्रेनने फुकट प्रवास करण्याची मजाच न्यारी.... दंडाची रक्कम वाचून व्हाल अवाक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 जानेवारी 2020

नागपूर : मध्य रेल्वे प्रशासनाने फुकट्यांवर आळा घालून अधिकृत प्रवाशांना दिलासा देण्यासाठी कंबर कसली आहे. एप्रिल ते डिसेंबरदरम्यान मध्य रेल्वेंच्या संपूर्ण विभागांमध्ये 29.89 लाख फुकट्यांची धरपकड करण्यात आली. या प्रकरणांमध्ये एकूण 155.14 कोटींचा दंड वसूल करण्यात आला.

नागपूर : मध्य रेल्वे प्रशासनाने फुकट्यांवर आळा घालून अधिकृत प्रवाशांना दिलासा देण्यासाठी कंबर कसली आहे. एप्रिल ते डिसेंबरदरम्यान मध्य रेल्वेंच्या संपूर्ण विभागांमध्ये 29.89 लाख फुकट्यांची धरपकड करण्यात आली. या प्रकरणांमध्ये एकूण 155.14 कोटींचा दंड वसूल करण्यात आला.

विना तिकीट प्रवाशांची संख्या तुलनेत कमी असली, तरी अनधिकृत डब्यातून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यामुळे रेल्वेचा महसूल बुडण्यासोबतच अधिकृत तिकीट घेणाऱ्या प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेता, मध्य रेल्वेकडून सातत्याने कारवाईची धडक मोहीम राबविण्यात येत आहे. त्याचे चांगले फलितही दिसून येत आहेत.

 

जाणून घ्या - मुलांना विकणारी 'सपना शूटर' आहे तरी कोण?
 

नऊ महिन्यांत 30 लाख फुकटे गवसले
गत वर्षी एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांच्या काळात 27.05 लाख फुकट्यांची धरपकड करण्यात आली होती. यंदा या संख्येत 10.50 टक्यांहि  ची वाढ नोंदविली गेली आहे. गत वर्षी फुकट्यांकडून 135.56 कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. यंदा वसुलीचा आकडा 155.14 कोटींवर पोहोचला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 14.44 टक्के अधिक आहे.

150 कोटींपेक्षा अधिक दंड वसूल
एकट्या डिसेंबर महिन्याचा विचार केल्यास मागच्या वर्षी 2.33 लाख फुकटे आढळले होते. यंदा 2.68 लाख फुकटे अडकले असून, हे प्रमाण 14.99 टक्यां33  नी अधिक आहे. गत वर्षी डिसेंबरमध्ये आढळलेल्या फुकट्यांकडून 10.40 कोटींचा दंड वसूल करण्यात आला होता. यंदा हा आकडा 12.20 कोटींवर पोहोचला आहे.

क्लिक करा - Video : ए भाई, जरा देखके चलो, आगे ही नहीं पीछे भी... का आली असे म्हणण्याची वेळ?
 

दलालांकडून तिकीट घेऊन वेगळ्या नावाने प्रवास करणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. यंदा असा प्रकार करणाऱ्यांविरोधातही मोहीम राबविण्यात आली. डिसेंबरमध्ये अशा प्रकारची अडीचशे प्रकरणे उघडकीस आली असून, संबंधितांकडून 1.95 लाखांचा दंड वसूल करण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: without ticket passengers news