
मृत महिला ही विवाहित असून ती तिच्या आईसोबत रान वाडी येथे राहत होती. घटनेच्या दिवशी मृत महिलेची आई काही कार्यक्रमाकरिता बाहेर गावी गेली होती. मृत महिला ही मानसिक आजारी असल्यामुळे तिला पाणी पाहल्यावर फिट येतो होती.
मेंढला (जि. नागपूर) : इथून अवघ्या ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या रानवाडी शिवारातील पाण्याच्या कॅनल मध्ये सोमवारी दुपारी ३.३० वाजता च्या सुमारास एका महिलेचा मृतदेह आढळून आला. मृत महिलेचे नाव शीला चंद्र भान बागडे वय वर्ष ५५ रा. रानवाडी ता. नरखेड येथील रहिवासी होती.
मृत महिला ही विवाहित असून ती तिच्या आईसोबत रान वाडी येथे राहत होती. घटनेच्या दिवशी मृत महिलेची आई काही कार्यक्रमाकरिता बाहेर गावी गेली होती. मृत महिला ही मानसिक आजारी असल्यामुळे तिला पाणी पाहल्यावर फिट येतो होती. त्यामुळे मृत महिला कॅनल वर गेल्यावर पाणी पाहून फिट आली असावी आणि ती पाण्यात पडली असावी त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहीत पोलिसांनी दिली.
पण या उलट मात्र गावातील परिसरात वेगळीच कुजबुज चर्चा सूरु आहे की..महिला जर पाण्याला भीत होती तर ती पाण्याजळव गेलीच कश्याला..आणि ते भी कपडे काढून..आम्ही आज पर्यंत तिला निवस्त्र अवस्थेत कधी पाहले नाही..प्रकरण दडपण्याचा प्रयत्न तर होत नाही ना?
रानवाडी शिवारातील लोकांना या महिलेचा मृत देह पाण्याच्या कॅनल मध्ये आढळून आला असून लगेच त्यांनी या बाबत पोलिसांना माहिती दिली असता लगेच जलालखेडा पोलिसांनी लगेच घटना स्थळ गाठून महिलेचा मृतदेह कॅनल मधून बाहेर काढला व उत्तरीय तपासणी साठी जलालखेडा येथील शववीच्छेदन गृहात पाठवण्यात आला असून मृत महिलेला दोन मुल व मुली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक राजेंद्र सोणवाने यांच्या मार्गदर्शन खाली प्रज्योग तायडे करत आहेत.
गावातील नागरिकांमद्धे वेगळीच चर्चा
मृत महिला शीला बागडे हिला मानसिक आजार असल्याचे आम्हाला कधी आढळून आले नाही. महिलेचा मृत देहावर कपडे नव्हते त्यामुळे या महिलेसोबत काही वाईट कृत्य करून तिला मारून टाकले असावे असा संशय गावकऱ्यांना आहे.तिला आम्ही याआधी कधीच निवस्त्र पाहले नाही.
संपादन - अथर्व महांकाळ