esakal | आईच्या हंबरड्याने पोलिसांचे पाणावले डोळे; घरातून निघून गेलेल्या मुलाचा घेतला फास्टट्रॅक शोध 
sakal

बोलून बातमी शोधा

police find missing child in Chandrapur in just one night

साहेब माझ्या मुलाला शोधून द्या असा हंबरडा एका आईने पोलीस स्टेशन मध्ये फोडल्याने पोलिसांनाहि राहवलं नाही.

आईच्या हंबरड्याने पोलिसांचे पाणावले डोळे; घरातून निघून गेलेल्या मुलाचा घेतला फास्टट्रॅक शोध 

sakal_logo
By
दिपक खेकारे

गडचांदुर (जि. चंद्रपूर ) : गडचांदूर येथील  ६ वर्षीय रोहित गोछायट हा बालक आईने मारल्याचा रागाने  २१ नोव्हेंबर च्या रात्री दहा वाजता च्या सुमारास घरून निघून गेल्याचे कळताच परिवाराने पोलीस स्टेशन गाठत संपूर्ण घडलेली कहाणी सांगत माझा बाळाला शोधून द्या असा हंबरडा फोडला असता गडचांदूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोपाल भारती आणि त्यांच्या टीमने रात्र जागून काढत शोध मोहीम हाती घेतली असता सकाळी ७ वाजता चा सुमारास रोहित पोलिसांच्या हाती लागला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गडचांदुर येथील वॉर्ड क्रमांक ६ येथे वास्तव्यास असणारी भीमा गोछायट वय २७ यांनी माझा ६ वर्षीय मुलाला मी मारल्याने रात्रीजे १० वाजता पासून घरून निघून गेला असून त्याची संपूर्ण परिसरात शोधाशोध केली असून कुठेच मिळतं नाही आहे . साहेब माझ्या मुलाला शोधून द्या असा हंबरडा एका आईने पोलीस स्टेशन मध्ये फोडल्याने पोलिसांनाहि राहवलं नाही.

क्लिक करा - ह्रदयद्रावक! चारित्र्यावर संशय; पोटात चार महिन्याचे बाळ असतानाही पूनमने गळफास लावून केली आत्महत्या

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक गोपाल भारती यांनी आपल्या सूत्राचा आधारे शोध मोहीम चालू केली संपूर्ण रात्र पोलिसांनी शोध मोहिमेत काढली तपासादरम्यान सकाळी ७ वाजता मुलगा घरापासू  २ किमी अंतरावर असणाऱ्या मामाच्या घरात पोलिसांना गवसला.

अवघ्या १० तासांतच पोलिसांनी शोध लावत आईचा हंबरडा थांबविला. पोलीस ही कुणाचे मुले आहेत आणि पोलीसांना सुद्धा मुले बाळे आहेत . आईच्या हंबरड्या ने पोलिसांना ही पाझर फुटला आणि मुलाला शोधून काढले.

हेही वाचा - हृदयस्पर्शी! मुळ गावी जाण्यासाठी कुटुंबीयांसह निघाला पती; वाटेत पत्नीने सोडली साथ, मुलं अनभिज्ञ

आम्हालाही मुले बाळे आहेत आणि मुलं घरातून निघून जाण्याने काय बितते हे सर्वांनाच कळते मुलाच्या आईच्या हंबरड्याने आम्ही ही भारावून गेलो आणि मुलाला शोधून काढले. 
गोपाल भारती 
पोलीस निरीक्षक गडचांदुर

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image
go to top