आर्थिक अडचणीचा गैरफायदा घेत महिलेवर अत्याचार, गुन्हा दाखल

विजयकुमार राऊत
Sunday, 25 October 2020

पीडित महिला आर्थिक अडचणीत होती. तिला पैशांची अत्यंत गरज असल्याने तिने जवळच्या लोकांना विचारणा केली. मात्र, तिची पैशांची व्यवस्था झाली नाही. नरेश चौकशे हे व्याजाने पैसे देतात हे तिला समजले. त्यानंतर तिने आरोपीकडून आर्थिक मदत घेतली.

कामठी ( जि. नागपूर ) : जुनी कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोदी पडाव येथे आर्थिक अडचणीत असलेल्या महिलेचा गैरफायदा घेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. महिलेच्या तक्रारीवरून आरोपीला अटक केली असून जुनी कामठी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - सर्वसामान्य गृहिणी ते यशस्वी बिल्डर, विदर्भातील पहिली बांधकाम व्यावसायिक ठरलेली महिला आहे तरी कोण?

नरेश चेतराम चौकशे (वय ६० वर्ष), असे आरोपीचे नाव आहे. पीडित महिला आर्थिक अडचणीत होती. तिला पैशांची अत्यंत गरज असल्याने तिने जवळच्या लोकांना विचारणा केली. मात्र, तिची पैशांची व्यवस्था झाली नाही. नरेश चौकशे हे व्याजाने पैसे देतात हे तिला समजले. त्यानंतर तिने आरोपीकडून आर्थिक मदत घेतली. दोघांचीही ओळख वाढल्यानंतर आरोपी वारंवार तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करत होता. मात्र, पीडितेने त्याला प्रतिसाद दिला नाही. काही दिवसांपूर्वी आरोपीने पीडितेला कुही येथे शेती पाहण्याच्या बहाण्याने नेले. त्यानंतर अ‌ॅक्टीव्हा गाडी शिकवतो, असे सांगून तिचा विनयभंग केला. महिलेने घरी सोडण्याची विनंती केली असता तिला घरी सोडले. मात्र, काही वेळानंतर परत येऊन त्याने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. तसेच घडलेली घटना कोणालाही सांगितल्यास पतीला त्रास होईल, अशी धमकी दिली. त्यामुळे पीडित महिला इतके दिवस शांत होती. शेवट तिने धाडस करून शनिवारी सायंकाळी जुनी कामठी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman physically abused in kamptee of nagpur