दुचाकीच्या पार्किंगसाठी सतत घालत होती वाद; मग त्याने महिलेच्या छातीत...

अनिल कांबळे
गुरुवार, 25 जून 2020

बुधवारी आरतीने दुचाकी पार्क केली. बंडूने तिच्यासोबत वाद घातला. यानंतर वाद विकोपाला गेला. त्यामुळे बंडू संतापला. त्याने चाकूने आरतीच्या हातावर, खांद्यावर, छातीवर व पोटोवर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात आरती खाली कोसळली व तिचा मृत्यू झाला.

नागपूर :  ती आणि तो शेजारी राहायचे... दुचाकी ठेवण्यावरून तिची नेहमी आरेरावी चालायची... त्यामुळे दोघांचेही अनेकदा "तू-तू-मैं-मैं' झाली... "जर ही एखाद्या दिवशी माझ्याशी वाजली तर गेमच करून टाकीन' अशी त्याने मनात खुन्नस ठेवली. अन्‌ तो दिवस आलाच... बुधवारी रात्रीच्या सुमारास पुन्हा दुचाकीच्या पार्किंगवरून दोघांत वाद झाला. युवकाने पाठीमागे लपविलेला चाकू काढला आणि थेट तिच्या छातीवर आणि पोटावर वार केले. काही मिनिटातच ती रक्‍ताच्या थारोळ्यात कोसळली आणि त्याने पळ काढला... 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरती नितीन गिरडकर (वय 34) ही महिला नंदनवन झोपडपट्टीतील गल्ली क्रमांक पाचमध्ये राहते. तर बंडू ऊर्फ एकनाथ प्रेमराज टापरे (वय 29) हा तिच्या शेजारी राहतो. एकमेकांचे शेजारी असले तरी त्यांचे पटत नव्हते. दुचाकी पार्क करण्यावरून त्यांच्यात नेहमी वाद होत होता.

जाणून घ्या - नवविवाहितेचा सासूसोबत झाला वाद; 'तुमचे काम करून देतो' असे म्हणतं प्रीती दासने केली ही मागणी...

बुधवारी आरतीने दुचाकी पार्क केली. बंडूने तिच्यासोबत वाद घातला. यानंतर वाद विकोपाला गेला. त्यामुळे बंडू संतापला. त्याने चाकूने आरतीच्या हातावर, खांद्यावर, छातीवर व पोटोवर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात आरती खाली कोसळली व तिचा मृत्यू झाला. यानंतर बंडू घटनास्थळावरून पसार झाला. खून झाल्याची माहिती समजताच नागरिकांची गर्दी जमली. 

एका नागरिकाने नंदनवन पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच नंदनवन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सांदीपन पवार यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी पंचनामा करून आरतीचा मृतदेह हॉस्पिटलकडे रवाना केला. पोलिसांनी शोध घेऊन बंडू याला अटक केली. आरतीचे पती नितीन यांचा डीजेचा व्यवसाय आहे. बंडू हा वाहनचालक आहे. त्याच्याविरुद्ध मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत.

महत्त्वाची बातमी - 'तू मला आवडतेस’ असे म्हणत शेतमालकानेच केला कामावर असणाऱ्या महिलेचा...

आरोपी युवक अटकेत

क्षुल्लक कारणावरून युवक बंडू ऊर्फ एकनाथ प्रेमराज टापरे याने चाकूने वार करून महिलेची हत्या केली. ही थरारक घटना नंदनवन झोपडपट्टीतील गल्ली क्रमांक पाच येथे बुधवारी रात्री घडली. नंदनवन पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकरी युवकाला अटक केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman stabbed to death in Nandanvan at Nagpur