esakal | थरार! सदरमध्ये भरचौकात महिलेला जिवंत जाळले; भांडण सोडविणे बेतले जिवावर
sakal

बोलून बातमी शोधा

The woman was burnt alive in Sadar Chowk Nagpur crime news

शबाना यांनी दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न करताच तरुण चवताळला. सोबत आणलेली बाटली त्याने शबाना यांच्या अंगावर ओतली आणि आगपेटी लावली. क्षणार्धात महिलेच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला.

थरार! सदरमध्ये भरचौकात महिलेला जिवंत जाळले; भांडण सोडविणे बेतले जिवावर

sakal_logo
By
योगेश बरवड

नागपूर : युवक आणि युवतीत सुरू असलेला वाद सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळल्याची घटना सदर येथील भरचौकात घडली आहे. शुक्रवारी सायंकाळी सदरच्या अंजुमन पॉलिटेक्निक कॉलेज जवळील हल्दिरामसमोर भरचौकात झालेल्या या घटनेतील महिलेचा शनिवारी रुग्णालयात मृत्यू झाला. शबाना अब्दुल जावेद (वय ४०, रा. महेंद्रनगर) असे मृत महिलेचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, शबाना या अजनीतील टाटा मोटर्समध्ये कार्यरत होत्या. शुक्रवारी सायंकाळी काम आटोपून त्या आपल्या ज्युपिटर मोपेडने परतीच्या प्रवासाला निघाल्या. हल्दीराम इमारतीपुढे तरुण-तरुणीचा आपसात वाद सुरू होता. युवक कमालीचा संतापला असल्याने गर्दीची वेळ असूनही कुणीही मध्यस्थीचा प्रयत्न केला नाही.

अधिक वाचा - गावातील लहान मुले शेतात गेले अन दिसले दोन बिबटे; आरडाओरडा केला तेव्हा समोर आला विचित्र प्रकार

शबाना यांनी तरुणीला मदतीची गरज असल्याचे हेरले. सद्‍भावनेतूनच त्या थांबल्या. वाहन ठेवून दोघांमध्ये मध्यस्थीचा प्रयत्न केला. डोक्यात सैतान संचारलेल्या युवकाला ही मध्यस्थी रुचली नाही. त्याने पेट्रोल भरलेली बाटली सोबतच आणली होती.

शबाना यांनी दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न करताच तरुण चवताळला. सोबत आणलेली बाटली त्याने शबाना यांच्या अंगावर ओतली आणि आगपेटी लावली. क्षणार्धात महिलेच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला.

हेही वाचा - चक्क १५० किलो सोन्या-चांदीच्या कमानीने केले होते आमदाराचे स्वागत, प्रचंड गर्दीत एकही दागिना गेला नाही चोरी

अचानक घडलेल्या या घटनेमुळे तेथे उपस्थित नागरिक अवाक झाले. महिला जळत असताना आरोपी युवक तरुणीला दुचाकीवर घेऊन पळून गेला. त्यानंतर नागरिकांनी धाव घेत आग विझवली.

शबाना यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. १२ तास मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शनिवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सदर पोलिसांनी तूर्त अकस्मात मृत्यूची नोंद करीत आरोपीचा शोध सुरू केला आहे.

नागपूर जिल्ह्यातील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा

go to top