महिलांचा दारूबंदीसाठी एल्गार; दुकान बंद करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयावर काढला मोर्चा

टीम ई सकाळ 
Friday, 22 January 2021

गट ग्रामपंचायत मांगली येथील ग्रामसेवक , सरपंच व सदस्यांनी कोरोनाच्या आडून ग्रामवासीयांना विश्वासात न घेता 21 जुलै 2020 रोजी परस्पर ठराव घेऊन गट ग्रामपंचायत मांगली हद्दीत दारूचे दुकान सुरू करण्याची परवानगी दिली. या दुकानामुळे येथील नागरिकांना त्रास होतो आहे. 

नागपूर  -गट ग्रामपंचायत मांगली हद्दीतील नागपूर-वर्धा जिल्हा सीमेवरील दारूचे दुकान बंद करण्याकरिता स्थानिक महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढुन दारूबंदीचा एल्गार पुकारला आहे.

हेही वाचा - वय अडीच वर्ष अन् 'इंडिया बूक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद, गुण ऐकूण तुम्हीही व्हाल...

गट ग्रामपंचायत मांगली येथील ग्रामसेवक , सरपंच व सदस्यांनी कोरोनाच्या आडून ग्रामवासीयांना विश्वासात न घेता 21 जुलै 2020 रोजी परस्पर ठराव घेऊन गट ग्रामपंचायत मांगली हद्दीत दारूचे दुकान सुरू करण्याची परवानगी दिली. या दुकानामुळे येथील नागरिकांना त्रास होतो आहे. 

असामाजिक तत्वांना ऊत येत असून ग्रामवासीयांना अनेक सामाजिक, आरोग्यदायी समस्यांना सामोरे जावे लागत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. 

नक्की वाचा - चक्क पोलिस आयुक्तांच्याच नावाने उघडले बनावट फेसबुक अकाउंट, अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट...

दारूचे दुकान तात्काळ बंद करण्यात यावे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व महिलांनी केली आहे. ग्रामवासीयांशी विश्वासघात करून दारुच्या दुकानाला परवानगी देणाऱ्या ग्रामपंचायतीमधील  समितीला बरखास्त करावे अशीही मागणी करण्यात आली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women protest against illegal wine shop