वय अडीच वर्ष अन् 'इंडिया बूक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद, गुण ऐकूण तुम्हीही व्हाल थक्क

श्रीकांत पेशट्टीवार
Friday, 22 January 2021

मूळचे अकोला येथील वैभव शेरेकर हे बँक ऑफ इंडियात अधिकारी आहेत. वैभव आणि पत्नी दीपाली यांची वैदिशा एकुलती एक मुलगी. वैदिशा दीड वर्षांची असताना वडिलांनी शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून फळ, भाजीपाला, पक्षी, प्राणी यांचे चार्ट तिच्यासाठी आणले.

चंद्रपूर : वैदिशा वय वर्षे अडीच. धावण्या, पळण्याच्या या वयात तिला जगभरातील दोनशेहून अधिक देशांच्या राजधान्या मूकपाठ आहेत. नुसत्या राजधान्याच नाही, तर कोणत्या देशाचा कोणता राष्ट्रध्वज आहे, हेही ती फाडफाड सांगते. तिच्या या अफाट बुद्धीमत्तेची दखल 'इंडिया बूक ऑफ रेकॉर्ड'ने घेतली. तिचे नाव 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये समाविष्ट करून तिचा राष्ट्रीयस्तरावर गौरव केला. 

हेही वाचा - तुरुंग अधीक्षकांनी झडती घेताच थरथरू लागला कर्मचारी, नंतर समोर आली धक्कादायक माहिती

मूळचे अकोला येथील वैभव शेरेकर हे बँक ऑफ इंडियात अधिकारी आहेत. वैभव आणि पत्नी दीपाली यांची वैदिशा एकुलती एक मुलगी. वैदिशा दीड वर्षांची असताना वडिलांनी शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून फळ, भाजीपाला, पक्षी, प्राणी यांचे चार्ट तिच्यासाठी आणले. घरातील भिंतीवर चिटकवून वैदिशाला त्याची ओळख करून दिली. एक-दोन दिवसांत ती अचूक पक्षी, फळे, प्राणी ओळखू लागली. तेव्हाच तिच्यातील बुद्धिमत्तेची कल्पना शेरेकर दाम्पत्याला आली. दिवसेंदिवस तिच्यातील प्रगती बघून शेरेकर दाम्पत्याने मध्यप्रदेशात असलेल्या रायपूर येथील मावशी शुभांगी थेटे यांना याची माहिती दिली. त्यांनाही वैदिशाच्या बुद्धिमत्तेची कल्पना आली. त्यांनी विविध देशांच्या राजधान्या, तेथील ध्वज याच्या माहितीबाबत सांगितले. त्यानंतर वैभव शेरेकर यांनी सुरुवातीला तिला मोबाईलमध्ये विविध देश, त्यांची राजधानी, त्यांचे ध्वज यांची माहिती दाखविली. दोन-तीन दिवसांनी परत ते दाखविण्यात आले. तेव्हा वैदिशाने न चुकता देश, राजधानी आणि ध्वज ओळखले. तेव्हाच तिच्यातील बुद्धिमत्तेची कल्पना वैभव शेरेकर, दीपाली शेरेकर यांना आली. त्यानंतर त्यांनी विविध देश, तेथील राजधानी आणि ध्वजाचा चार्टच वैदिशासाठी आणला. 

हेही वाचा - मन सुन्न करणारी घटना! 'डिअर मॉम...आय लव्ह यू' लिहून सोडला जीव, आईनं फोडला एकच हंबरडा

नोव्हेंबर महिन्यांपासून आईने तिला देश, राजधानी, ध्वज याची माहिती देण्यास सुरुवात केली. काही दिवसांतच वैदिशा विचारलेले देश, त्यांची राजधानी फडाफड सांगत आहे. वैदिशाची बुद्धिमत्ता बघून तिच्या मावशीने इंडिया बुक ऑफ रेकार्डमध्ये नाव नोंदविण्यास सुचविले. त्यानुसार शेरेकर यांनी वैदिशाची संपूर्ण माहिती, ती सांगत असलेले व्हिडिओ तयार करून पाठविले. त्याची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली. तिचे नाव इंडिया बुक ऑफ रेकार्डमध्ये समाविष्ट करण्यात आले. इंडिया बुक ऑफ रेकार्डनुसार भारतातील ती अशी एकमेव मुलगी असल्याचा दावा तिच्या पालकांनी केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two and half years old girl vaidisha from chandrapur learn all country capital and many more things