एक दिवसाआड शाळेत जायचे मग कोरोनाचे काम कधी करायचे? 

मंगेश गोमासे
Monday, 9 November 2020

सहा महिन्यांपासून अनेक शिक्षकांच्या सेवा आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कोरोना साथरोग उपाययोजना कार्यक्रमाकरिता संलग्न करण्यात आल्या आहेत. त्यानुसार शिधावाटप केंद्रावर, विलगीकरण केंद्र, निरंतर सर्वेक्षण आदी विविध ठिकाणी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

नागपूर  ः राज्य शासनाने परिपत्रक निर्गमित करून शाळेत दररोज ५० टक्के शिक्षकांना उपस्थित रहाणे बंधनकारक केले आहे. तर दुसरीकडे कोरोना साथरोग उपाययोजनाअंतर्गत आताही शिक्षकांच्या सेवा संलग्न करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शासनाच्या अशा दोन्ही सेवांमुळे शिक्षक संभ्रमात पडले असून करोना कामातून मुक्त करावे, अशी मागणी होत आहे.

मागील सहा महिन्यांपासून अनेक शिक्षकांच्या सेवा आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कोरोना साथरोग उपाययोजना कार्यक्रमाकरिता संलग्न करण्यात आल्या आहेत. त्यानुसार शिधावाटप केंद्रावर, विलगीकरण केंद्र, निरंतर सर्वेक्षण आदी विविध ठिकाणी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

चालू शैक्षणिक सत्रात शाळा अद्याप सुरू झालेल्या नाहीत. परंतु, ऑनलाईन, ऑफलाईन व दूरस्थ शिक्षण पद्धतीने विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देणे सुरू आहे. अलीकडेच शासनाने एक परिपत्रक निर्गमित करून शाळेत दररोज ५० टक्के शिक्षकांना उपस्थित राहणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे सर्व शिक्षकांना दिवसाआड शाळेत उपस्थित राहाणे आवश्यक असणार आहे. 

हेही वाचा - अहोऽऽ हे काय केलं? आता कशाला सोडलं पाणी; तुमच्या चुकीमुळे दिवाळी गेली ना अंधारात
 

मात्र, शिक्षकांच्या सेवा आताही कोरोनासाठी संलग्न केल्याने त्यांनी शाळेत कसे जावे, असा प्रश्न पडला आहे. याशिवाय शाळा अनेक महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या सुरुवातीलाच शिक्षकांना कोरोना कामातून कार्यमुक्त करण्याची कार्यवाही करावी, असे शासनाच्या शिक्षण विभागाकडून मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकाºयांना सुचित करण्यात आले होते.

परंतु, अजूनपर्यंत याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. सध्या शाळेत शिक्षकांना उपस्थित राहण्याबाबत शासनाकडून देण्यात आलेल्या सूचना लक्षात घेता कोविड-१९ च्या कामातून शिक्षकांना त्वरित कार्यमुक्त करण्यात यावे अशी मागणी केली जात आहे. 
 
संपादन  : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: work on corona or education, the question of teachers