esakal | नागपूर मेट्रो सुसाट! कोरोना काळातही काम वेगानं सुरु; एलएडी चौक स्टेशन प्रवासी सेवेसाठी सज्ज 
sakal

बोलून बातमी शोधा

Work of nagpur Metro is going fast even in pendamic

हिंगणा मेट्रो मार्गावर एकूण ११ स्टेशन आहेत. त्यात लोकमान्यनगर, बंसीनगर, वासुदेवनगर, रचना रिंग रोड, सुभाषनगर, अंबाझरी लेक व्ह्यू, एलएडी चौक, शंकरनगर, इंस्टीट्यूट ऑफ इंजिनिअर्स, झाशी राणी चौक आणि सीताबर्डी इंटरचेंज स्टेशनचा समावेश आहे.

नागपूर मेट्रो सुसाट! कोरोना काळातही काम वेगानं सुरु; एलएडी चौक स्टेशन प्रवासी सेवेसाठी सज्ज 

sakal_logo
By
राजेश प्रायकर

नागपूर :  लॉकडाऊनच्या काळातही महामेट्रोने विकासाची गती कायम राखत चार स्टेशनची कामे पूर्ण केली. यात एलएडी चौकातील मेट्रो स्टेशन आता प्रवासी सेवेसाठी सज्ज झाले आहे. हिंगणा मार्गावरील हे आठवे स्टेशन असून लॉकडाऊननंतर प्रवाशांना या स्टेशनवरून गंतव्य ठिकाण गाठता येणार आहे.

हिंगणा मेट्रो मार्गावर एकूण ११ स्टेशन आहेत. त्यात लोकमान्यनगर, बंसीनगर, वासुदेवनगर, रचना रिंग रोड, सुभाषनगर, अंबाझरी लेक व्ह्यू, एलएडी चौक, शंकरनगर, इंस्टीट्यूट ऑफ इंजिनिअर्स, झाशी राणी चौक आणि सीताबर्डी इंटरचेंज स्टेशनचा समावेश आहे. यापैकी लोकमान्यनगर, वासुदेवनगर, सुभाषनगर, इंस्टीट्यूट ऑफ इंजिनिअर्स, झाशी राणी चौक, बंसीनगर आणि सिताबर्डी स्टेशनचे काम पूर्ण झाले. 

हेही वाचा - ही लक्षणं देतात शरीरातील कमी ऑक्सिजनची पूर्वसूचना; हे उपाय करा आणि मिळवा नैसर्गिक ऑक्सिजन

या स्टेशनवरून प्रवासी वाहतूक सुद्धा सुरू झाली. यात आता एलएडी चौक स्टेशनचीही भर पडली. हे स्टेशन ४४६६. ३३ वर्ग मीटर क्षेत्रात तयार करण्यात आले आहे. स्टेशनच्या दोन्ही उत्तर व दक्षिण बाजूने आगमन, निर्गमनची व्यवस्था आहे. ग्राउंड लेव्हल, कॉनकोर्स लेव्हल आणि प्लॅटफॉर्म अशा तीन मजली इमारतीचे काम पूर्ण झाले. दुसऱ्या मजल्यावर तिकीट काउंटर व स्टेशन कंट्रोल रूम तयार करण्यात आले आहे. 

याशिवाय आपातकालीन परिस्थितीसाठी बेसमेंटमध्ये अग्निशमन टॅंक, छतावर सौर पॅनल, बायो डायजेस्टर, एस्केलेटर्स, दिव्यांगासाठी लिफ्ट, अखंड वीजपुरवठ्यासाठी डिझल जनरेटर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, स्वच्छतागृह, लहान मुलांच्या देखरेखीसाठी बेबी केअर रूम, दुकानांसाठी जागा, सीसीटीव्ही आदीची सुविधाही करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा - ते लांब बसून रडत होते; काही नागरिक बघून निघून गेले, पडाटे आले सत्य समोर

सीएमआरएसचे पथक आज करणार पाहणी

हिंगणा, वर्धा मार्गावरील पूर्ण झालेल्या स्टेशनच्या कामाची पाहणी करण्यासाठी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त जनककुमार गर्ग यांच्या नेतृत्वातील पथक उद्या, २१ सप्टेंबरला शहरात येत आहे. पथक वर्धा मार्गावरील अजनी चौक आणि रहाटे कॉलनी मेट्रो स्टेशन तसेच हिंगणा मार्गावरील बंसीनगर आणि एलएडी चौक मेट्रो स्टेशनचे परीक्षण करणार आहे. गर्ग यांनी यापूर्वी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या चारही मेट्रो स्टेशनची पाहणी केली होती.

संपादन - अथर्व महांकाळ