महिलांनो कोरोनाला घाबरताय! जाणून घ्या बचावासाठी या काही टीप्स

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जून 2020

कोरोनापासून बचावासाठी काही महिलांनी एकत्रित येऊन व्हिडीओ तयार केला आहे. यामध्ये काही मैत्रिणींनी अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात विशेषत:स्त्रियांनी काय काय खबरदारी घ्यायची हे सांगितले आहे.

नागपूर : सकाळी उठल्यावर गरम पाणीच पिणे पुरेसे आहे का?, मुलांना दुधात हळद टाकून देऊ की, आणखी काही प्रोटीन देऊ, बाहेरून आणलेले किराणा सामान, भाजी थोडा वेळ बाहेरच ठेऊ का? मुलांचे चॉकलेटही पाण्याने धुवुन घेऊ का? असे एक ना अनेक प्रश्‍न सध्या महिलांना पडत आहेत. या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न नागपूरातील काही महिलांनी केला आहे. कोरोना विषाणूपासून बचाव करण्याकरीता काही महिलांनी ऑनलाइन पद्धतीने एकत्रित येऊन, जगजागृतीपर संदेश देणारा व्हिडीओ तयार केला आहे.
जगभरात कोरोना व्हायरस जीवघेणा ठरतो आहे. या आजारावर आजतागायत कोणताही अधिकृत उपचार शोधला गेला नाहिये. तसंच या व्हायरसवर ठोस उपाय म्हणून लसीकरणही उपलब्ध नाही, अशी माहिती भारत सरकारच्या आरोग्य विभागाने अलीकडेच नागरिकांना दिली. त्यामुळे या "कोरोना' पासून दूर राहण्यासाठी काळजी घेणे हाच एकमात्र उपाय आहे.
कोरोनापासून बचावासाठी काही महिलांनी एकत्रित येऊन व्हिडीओ तयार केला आहे. यामध्ये काही मैत्रिणींनी अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात विशेषत:स्त्रियांनी काय काय खबरदारी घ्यायची हे सांगितले आहे. हा व्हिडीओ घरी राहूनच तयार केला आहे. सध्या विविध चॅलेंज देणे खूप प्रचलित झाले आहे. त्यामुळे बायकांना फक्त नटण्या मुरडण्यापलीकडे काही दिसतच नाही अशी दुषणे देऊन, सोशल मिडीयावर ट्रोल केले जात आहे. या ट्रोलींगला उत्तर देतांना विदर्भातील महिलांनी अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात काय खबरदारी घ्यावी याविषयी या व्हिडीओच्या माध्यमातून जनजागृती सुरू केली आहे. व्हिडीओमध्ये महिलांनी रोज योगा, प्राणायाम करणे, स्वतःचे व लहान मुलांचे निर्जंतुकीकरण, मास्क वापरणे, दोन मीटरचे अंतर राखणे, भाज्या मिठाच्या पाण्याने धुणे, साबणाने हात स्वच्छ धुणे, घरातील दार हॅण्डल लॉक, गाडी व कार निर्जंतुक करणे असे संदेश नव्या पद्धतीने दिले आहेत. या व्हिडीओमधील संदेशाचे निता चिकारे यांनी लेखन केले असून, यात स्मिता कुलकर्णी (पुणे), श्वेता बंगाले (मुंबई), निता चिकारे (नागपूर), श्वेता आंबेकर (नागपूर), आदिती पाठक (नागपूर), राजश्री बनसोड (नागपूर), प्रिया पळसोकर (यवतमाळ), पल्लवी चिकारे(नागपूर) यांचा समावेश आहे.

सविस्तर वाचा - ...तरी रस्ते तयार मोकळे करायला तयार नाहीत नागरिक

माहितीपटातून जनजागृती
देशावर जीवन मरणाचे संकट आलेले असतांना बायका केवळ नटण्या मुरडण्यात वेळ घालवित त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करीत आहेत. असा चुकीचा मेसेज सर्वत्र पसरविला जात होता. परंतु, कुटुंबाला कोरोना विषाणुपासून दूर ठेवण्यासाठी सर्वांत महत्वाची भूमिका घरातील महिलेची आहे आणि ती योग्य प्रकारे पार पाडू शकते. स्रियांनी कशा पद्धतीने आपल्या कुटुंबाला कोरोनापासून दूर ठेवावे यासाठी माहितीपट तयार करून आम्ही जनजागृती करीत आहोत.
नीता चिकारे, नागपूर.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Worried about corona? don''t worry